मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 4 टीम्स एकमेकांना भिडणार; राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर IPL मधील चुरस वाढली

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 4 टीम्स एकमेकांना भिडणार; राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर IPL मधील चुरस वाढली

राजस्थान रॉयल्स टीम सनरायझर्स हैदराबादकडून हरल्यामुळे आता चारही टीम्सना 10 मॅचमध्ये मिळून सारखेच म्हणजे 8 गुण मिळाले आहेत.

राजस्थान रॉयल्स टीम सनरायझर्स हैदराबादकडून हरल्यामुळे आता चारही टीम्सना 10 मॅचमध्ये मिळून सारखेच म्हणजे 8 गुण मिळाले आहेत.

राजस्थान रॉयल्स टीम सनरायझर्स हैदराबादकडून हरल्यामुळे आता चारही टीम्सना 10 मॅचमध्ये मिळून सारखेच म्हणजे 8 गुण मिळाले आहेत.

    नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2021 चं (IPL 2021) दुसरं पर्व सध्या सुरू आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या टीम्सनी प्लेऑफमध्ये जवळपास प्रवेश केलाच आहे. मात्र बाकीच्या सहा टीम्समध्ये अद्याप अटीतटीची लढत आहे. आयपीएल 2021 मधल्या 40व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) टीमने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमला 7 विकेट्सनी हरवलं आणि त्या मॅचनंतर गुणतालिका खूपच अटीतटीच्या स्थितीत पोहोचली आहे. राजस्थान टीमने या मॅचमध्ये विजय मिळवला असता, तर ती टीम गुणतालिकेत पहिल्या चार टीम्समध्ये पोहोचली असती, मात्र राजस्थान रॉयल्स टीम सनरायझर्स हैदराबादकडून हरल्यामुळे आता चारही टीम्सना 10 मॅचमध्ये मिळून सारखेच म्हणजे 8 गुण मिळाले आहेत.

    गुणतालिकेत चेन्नई सुपरकिंग्ज टीम सर्वोच्च स्थानी आहे. 10 मॅचेसपैकी 8 मॅचेसमध्ये ही टीम जिंकली असून, केवळ दोन मॅचेस त्यांना गमवाव्या लागल्या. त्यामुळे चेन्नई टीमला 16 गुण मिळाले आहेत. दिल्ली कॅपिटल्स टीमनेही 10 मॅचेसपैकी 8 मॅचेसमध्ये विजय मिळवला आहे, मात्र त्यांचा नेट रन रेट धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज टीमपेक्षा कमी आहे. त्यामुळे ती टीम दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) ही टीम 10 पैकी 6 मॅचेसमध्ये विजयी झाली असून, ती गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकांवर मात्र चार टीम्समध्ये चुरस आहे. कारण या चारही टीम्सना समान म्हणजेच 8 गुण मिळाले आहेत. त्यामुळे प्लेऑफची (Playoff) शर्यत खूपच रोमांचक स्थितीत पोहोचली आहे.

    आयपीएल 2021 : रवींद्र जाडेजाच्या `या` कृतीमुळे फॅन्सनी केलं त्याचं कौतुक

    राजस्थान रॉयल्स टीमच्या पराभवानंतर आता त्या टीमसह कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या टीम्सना प्रत्येकी 8 गुण मिळाले आहेत. पण नेट रन रेट जास्त चांगला असल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स टीम या चौघांत आघाडीवर असून, त्या टीमने गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. पंजाब किंग्ज पाचव्या, राजस्थान रॉयल्स सहाव्या, मुंबई इंडियन्स सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानावर आहे.

    #SRHvRR : हैदराबादचा शेवट गोड, राजस्थानवर 'रॉयल' विजय

    सनरायझर्स हैदराबाद टीमला 10 मॅचेसमध्ये केवळ 4 गुणच मिळाले आहेत. आता ही टीम त्यांच्या उर्वरित सर्व मॅचेस जिंकली, तर त्या टीमला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. याचाच अर्थ असा, की आता जसजशा पुढच्या मॅचेस होत जातील, तसतशी गुणतालिका अधिकाधिक रोमांचक होत जाईल.

    आयपीएल 2021 च्या 40व्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या विजयात जेसन रॉय आणि कॅप्टन केन विल्यम्सन यांचा मोलाचा वाटा होता. दोघांनीही शानदार हाफ-सेंच्युरी करून राजस्थान रॉयल्सच्या पराजयावर शिक्कामोर्तब केलं. जेसन रॉयने हैदराबाद संघात पदार्पण करतानाच्या या मॅचमध्ये 60 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. विल्यम्सनने नाबाद 51 रन्स केले. राजस्थान टीमकडून कॅप्टन संजू सॅम्सनने 82 रन्स केले, मात्र त्यांच्या बॉलर्सच्या खराब कामगिरीमुळे त्याची ही खेळी वाया गेली.

    First published:
    top videos

      Tags: IPL 2021