मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : वॉर्नर-राशिदनंतर आणखी एका दिग्गजाचा पत्ता कट, SRH ने या खेळाडूंना केलं रिटेन

IPL Retention 2022 : वॉर्नर-राशिदनंतर आणखी एका दिग्गजाचा पत्ता कट, SRH ने या खेळाडूंना केलं रिटेन

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) सनरायजर्स हैदराबादने (SRH) रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हैदराबादच्या टीमने घोषित केलेली ही यादी बघून अनेकांना धक्का बसला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) सनरायजर्स हैदराबादने (SRH) रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हैदराबादच्या टीमने घोषित केलेली ही यादी बघून अनेकांना धक्का बसला आहे. हैदराबादने नव्या मोसमासाठी केन विलियमसन (Kane Williamson), अब्दुल समद (Abdul Samad) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांना रिटेन केलं आहे. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, राशिद खान, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार या दिग्गजांना हैदराबादने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

हैदराबादच्या टीमने तीन खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांना केन विलियमसनला 15 कोटी, अब्दुल समदला 4 कोटी आणि उमरान मलिकला 4 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.या तीन खेळाडूंवर 33 कोटी रुपये खर्च केल्यामुळे हैदराबादच्या टीमकडे आता लिलावात खर्च करण्यासाठी 68 कोटी रुपये शिल्लक आहेत.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू रिटेन करायला परवानगी होती, असं असलं तरी हैदराबादने तीनच खेळाडूंना रिटेन केलं.

रिटेनच्या नियमानुसार 4 खेळाडू रिटेन केलेल्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दोन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी, तसंच एक खेळाडू रिटेन केलं तर 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. अनकॅप खेळाडू रिटेन केला तर त्याच्यासाठी 4 कोटी रुपये टीमला खर्च करावे लागणार आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, SRH