मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : विराटच्या मॅच विनरची पुन्हा होणार RCB मध्ये एण्ट्री, टीमने दिली 'ऑफर'

IPL 2022 : विराटच्या मॅच विनरची पुन्हा होणार RCB मध्ये एण्ट्री, टीमने दिली 'ऑफर'

आयपीएल 2022 साठी (IPL Retention 2022) मंगळवारी सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आरसीबीने (RCB) विराट कोहली (Virat Kohli, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) रिटेन केलं.

मुंबई, 1 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Retention 2022) मंगळवारी सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आरसीबीने (RCB) विराट कोहली (Virat Kohli, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) रिटेन केलं, पण टीमला अनेकवेळा मॅच जिंकवून देणाऱ्या युझवेंद्र चहलचं (Yuzvendra Chahal) नाव या यादीत नव्हतं, त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. आरसीबी युझवेंद्र चहलला रिटेन करेल, असं आरसीबीचे चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांना वाटत होतं.

युझवेंद्र चहलने मंगळवारी रात्री रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर झाल्यानंतर आरसीबीचे आभार मानले. इन्स्टाग्रामवर आरसीबीच्या फोटोवर चहलने कमेंट केली. 'आरसीबीचे प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद,' असं चहल म्हणाला. आरसीबीने चहलच्या या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. 'आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करतो, तू आयुष्यभर RCBian आहेस. लवकरच तुला आरसीबीच्या रंगात खेळताना बघण्याची अपेक्षा करतो,' अशी कमेंट आरसीबीने केली.

आरसीबीने माजी कर्णधार विराट कोहलीला 15 कोटी, ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी आणि मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. आता टीमकडे 57 कोटी रुपये लिलावात खर्च करण्यासाठी आहेत. युझवेंद्र चहल आरसीबीकडून मिळणाऱ्या मानधनावर खूश नव्हता, म्हणून त्याने स्वत:ला रिटेन करायला नकार दिल्याचं वृत्त आहे. लिलावामध्ये आपल्याला जास्त पैसे मिळतील, असं चहलला वाटत असल्याचं बोललं जातंय.

चहलने याआधी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करियरचा अखेरचा मोसम आरसीबीकडून खेळायचा आहे, असं सांगितलं होतं. बीसीसीआयने आयपीएल लिलावाआधी रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या मर्यादित ठेवली होती, त्यामुळे प्रत्येक टीमना त्यांचे महत्त्वाचे खेळाडू सोडावे लागले. याशिवाय रिटेन केलेल्या खेळाडूंचा पगारही बीसीसीआयने निश्चित केला. चहलला आरसीबीने रिटेन केलं नसलं तरी जर त्याला दोन नव्या टीमने लिलावाआधी विकत घेतलं नाही, तर आरसीबी पुन्हा एकदा त्याच्यावर लिलावात बोली लावू शकते. आयपीएलच्या दोन नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद यांना 25 डिसेंबरपर्यंत प्रत्येकी 3-3 खेळाडू विकत घेता येणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, RCB, Virat kohli, Yuzvendra Chahal