मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : 24 तासांमध्ये पंजाबला दुसरा धक्का, राहुलनंतर आणखी एकाने सोडली साथ, दोघं नव्या टीममध्ये दिसणार!

IPL 2022 : 24 तासांमध्ये पंजाबला दुसरा धक्का, राहुलनंतर आणखी एकाने सोडली साथ, दोघं नव्या टीममध्ये दिसणार!

आयपीएल 2022 साठी (IPL 2022 Retention) सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली आहे. सगळ्या टीमनी त्यांचे प्रमुख खेळाडू कायम ठेवले असले तरी पंजाब किंग्सला (Punjab Kings) मोठा धक्का बसला आहे.

मुंबई, 1 डिसेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL 2022 Retention) सगळ्या 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली आहे. सगळ्या टीमनी त्यांचे प्रमुख खेळाडू कायम ठेवले असले तरी पंजाब किंग्सला (Punjab Kings) मोठा धक्का बसला आहे. केएल राहुलने (KL Rahul) पंजाब किंग्सची साथ सोडली, यानंतर 24 तासांच्या आत पंजाब किंग्सला दुसरा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि पंजाब किंग्सचे असिस्टंट कोच एण्डी फ्लॉवर (Andy Flower) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंडचा कोच म्हणून काम पाहिलेले एण्डी फ्लॉवर 2020 साली पंजाब किंग्ससोबत जोडले गेले.

'नुकताच फ्लॉवर यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. फ्लॉवरचा हा राजीनामा पंजाबच्या टीमने स्वीकारला आहे. ते आता लखनऊ किंवा अहमदाबाद या नव्या टीमशी जोडला जाण्याची शक्यता आहे,' असं बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सांगितलं. आयपीएलमध्ये 53 वर्षांच्या एण्डी फ्लॉवर यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मागच्या 2 वर्षांपासून फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यासोबत काम करत होते.

आयपीएलची सगळ्यात धक्कादायक यादी, 19 भारतीयांना बाहेरचा रस्ता, पाहा संपूर्ण लिस्ट

पंजाब किंग्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता फ्लॉवर कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (CPL)सेंट लुसिया किंग्सचे कोच राहणार का नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या टीमची मालकीही पंजाब किंग्सकडे आहे. वसीम जाफर मागच्या मोसमापासून पंजाबचा बॅटिंग कोच आणि जॉन्टी ऱ्होड्स फिल्डिंग कोच आहे.

पंजाब किंग्सची केएल राहुलला टीमसोबत ठेवण्याची इच्छा होती, पण स्वत: राहुललाच दुसऱ्या टीमकडून खेळायचं होतं. पंजाबमधून बाहेर पडलेला केएल राहुल लखनऊ टीमसोबत खेळू शकतो, असं वृत्त काही माध्यमांमध्ये आलं आहे. पंजाब किंग्सने जानेवारी महिन्यात होणाऱ्या लिलावाआधी मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांना रिटेन केलं आहे. आयपीएल इतिहासात पंजाब किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे, आतापर्यंत टीमला एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही.

IPL Retention Full List : कोहली, धोनी रोहितसह 27 खेळाडू रिटेन, पाहा संपूर्ण यादी

First published:
top videos