मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : कॅप्टन्सी सोडल्यानंतरही RCB मध्ये विराटचंच राज्य, फेवरेट खेळाडू टीममध्ये कायम

IPL Retention 2022 : कॅप्टन्सी सोडल्यानंतरही RCB मध्ये विराटचंच राज्य, फेवरेट खेळाडू टीममध्ये कायम

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आरसीबीने विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना रिटेन केलं आहे. आश्चर्यकारकरित्या बँगलोरने देवदत्त पडिक्कल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलला रिटेन केलेलं नाही. आयपीएल नियमानुसार प्रत्येक टीमला 4 खेळाडू रिटेन करण्याची संधी असतानाही आरसीबीने तिघांनाच संधी दिली.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू रिटेन करायला परवानगी होती.

आरसीबीने तीन खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांना विराट कोहलीला 15 कोटी रुपये, ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी रुपये आणि मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. रिटेनच्या नियमानुसार 4 खेळाडू रिटेन केलेल्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दोन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी, तर एक खेळाडू रिटेन केला तर 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, RCB