मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : Rajasthan Royals चा स्टोक्स-आर्चरला धक्का, सगळ्यात महागडा खेळाडूही बाहेर

IPL Retention 2022 : Rajasthan Royals चा स्टोक्स-आर्चरला धक्का, सगळ्यात महागडा खेळाडूही बाहेर

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. राजस्थानने त्यांच्या टीममधून बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांना धक्का दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. राजस्थानने त्यांच्या टीममधून बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांना धक्का दिला आहे, तर आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू असलेल्या क्रिस मॉरिस (Chris Morris) यालाही राजस्थानने बाहेर केलं आहे. राजस्थानने त्यांच्या टीममध्ये संजू सॅमसन (Sanju Samson), जॉस बटलर (Jos Butller), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या तीन खेळाडूंना कायम ठेवलं आहे. आयपीएल 2021 मध्ये बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर दुखापतींमुळे खेळले नव्हते.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू रिटेन करायला परवानगी होती, असं असलं तरी राजस्थानने तीनच खेळाडूंना रिटेन केलं.

राजस्थानने तीन खेळाडूंना रिटेन केलं असल्यामुळे संजू सॅमसनला 14 कोटी, जॉस बटलरला 10 कोटी आणि यशस्वी जयस्वालला 4 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या तीन खेळाडूंवर 28 कोटी रुपये खर्च केल्यामुळे राजस्थानच्या टीमकडे आता लिलावात खर्च करण्यासाठी 62 कोटी रुपये शिल्लक आहेत.

रिटेनच्या नियमानुसार 4 खेळाडू रिटेन केलेल्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दोन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी, तसंच एक खेळाडू रिटेन केलं तर 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. अनकॅप खेळाडू रिटेन केला तर त्याचे 4 कोटी रुपये कट केले जातात.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Rajasthan Royals