मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : Punjab Kings मधून सगळे स्टार बाहेर, प्रितीच्या टीमचा फक्त दोघांवर विश्वास

IPL Retention 2022 : Punjab Kings मधून सगळे स्टार बाहेर, प्रितीच्या टीमचा फक्त दोघांवर विश्वास

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) पंजाब किंग्सने (Punjab Kings) फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केलं आहे. मागच्या मोसमापर्यंत कॅप्टन असलेल्या केएल राहुल (KL Rahul) याला पंजाबने टीममध्ये कायम ठेवलेलं नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) पंजाब किंग्सने (Punjab Kings) फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केलं आहे. मागच्या मोसमापर्यंत कॅप्टन असलेल्या केएल राहुल (KL Rahul) याला पंजाबने टीममध्ये कायम ठेवलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल पंजाबच्या टीमसोबत राहण्यासाठी इच्छुक नसल्याचं वृत्त समोर येत होतं, या वृत्ताला अखेर दुजोरा मिळाला आहे. पंजाब किंग्सने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या दोघांचा समावेश आहे. डावखुरा फास्ट बॉलर असलेल्या अर्शदीप सिंगने मागच्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली होती.

पंजाब किंग्सकडे केएल राहुल, क्रिस गेल (Chris Gayle), निकोलस पूरन (Nicholas Pooran) यांच्यासारखे तगडे खेळाडू होते, तसंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी गाजवणारा शाहरुख खानही (Shahrukh Khan) पंजाबच्या टीममध्ये होता, पण यातल्या एकाही खेळाडूला रिटेन न करण्याचा निर्णय पंजाब किंग्सने घेतला आहे.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू रिटेन करायला परवानगी होती.

रिटेन करण्याचे नियम

पंजाब किंग्सने दोनच खेळाडूंना रिटेन केल्यामुळे त्यांना मयंक अग्रवालला 12 कोटी रुपये आणि अर्शदीप सिंगला 4 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. रिटेनच्या नियमानुसार 4 खेळाडू रिटेन केलेल्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील. तसंच एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction