मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : Mumbai Indians चा शेवटच्या क्षणी धक्का, हे 4 खेळाडू मुंबईचे 'किंग'

IPL Retention 2022 : Mumbai Indians चा शेवटच्या क्षणी धक्का, हे 4 खेळाडू मुंबईचे 'किंग'

आयपीएल 2022 साठीच्या (IPL Players Retention 2022) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा झाली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चार खेळाडूंना रिटेन केलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठीच्या (IPL Players Retention 2022) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा झाली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यावर मुंबईने विश्वास दाखवला आहे. गेली कित्येक वर्ष मुंबईकडून खेळलेल्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांना मुंबईने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर ईशान किशन (Ishan Kishan) यालाही मुंबईला रिटेन करता आलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मुंबई इंडियन्स ईशान किशनला संधी द्यायची का सूर्यकुमार यादवला याबाबत गोंधळात होती. ईशान किशनला टीममध्ये घेऊन सूर्यकुमार यादवला लिलावात विकत घेण्याची मुंबईची रणनिती होती, पण त्यांनी अखेरच्या क्षणी धक्का देत सूर्यकुमार यादववर विश्वास दाखवला.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू रिटेन करायला परवानगी होती.

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली, पण 2021 च्या मोसमात त्यांची कामगिरी खराब झाली. मुंबई इंडियन्सना प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नाही. हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचा फॉर्म मुंबईच्या या कामगिरीचं प्रमुख कारण ठरला. हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळे तो संपूर्ण आयपीएलमध्ये बॉलिंगही करू शकला नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली. रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे मुंबईच्या या कामगिरीचे प्रमुख खेळाडू ठरले होते.

रिटेन करण्याचा नियम

4 खेळाडू रिटेन केल्यामुळे मुंबईला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील. दोन खेळाडू कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी तसंच एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

First published:

Tags: Ipl 2022 auction, Mumbai Indians