मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : KKR ने दोन्ही कॅप्टननाच दिला डच्चू, 'मिस्ट्री'मध्ये अडकली शाहरुख-जुहीची जोडी

IPL Retention 2022 : KKR ने दोन्ही कॅप्टननाच दिला डच्चू, 'मिस्ट्री'मध्ये अडकली शाहरुख-जुहीची जोडी

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. केकेआरला या मोसमात फायनलपर्यंत घेऊन जाणारा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याला डच्चू देण्याचा निर्णय टीमने घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. केकेआरला या मोसमात फायनलपर्यंत घेऊन जाणारा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) याला डच्चू देण्याचा निर्णय टीमने घेतला आहे, तसंच टीमचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याचसह शुभमन गिल (Shubhaman Gill) यालाही केकेआरने स्थान दिलं नाही. आयपीएल 2022 साठी केकेआरने आंद्रे रसेल (Andre Russell), व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि सुनिल नारायण (Sunil Narine) यांना रिटेन केलं आहे.

मिस्ट्री स्पिनर असलेल्या वरुण चक्रवर्तीची नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियात (Team India) निवड झाली होती, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. यानंतर वरुण चक्रवर्तीच्या निवडीबाबत अनेकांनी टीका केली, तसंच त्याच्या फिटनेसवरही वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. असं असलं तरी शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या टीमने वरुणवर विश्वास दाखवला आहे.

दुसरीकडे मध्यम गती बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या व्यंकटेश अय्यरने आयपीएलच्या या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरच्या या कामगिरीमुळे केकेआर यंदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचली. अय्यरच्या या कामगिरीमुळे त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियात निवड झाली. एवढच नाही तर व्यंकटेश अय्यरकडे हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणूनही बघितलं जाऊ लागलं आहे.

केकेआरने 4 खेळाडू रिटेन केल्यामुळे त्यांना आंद्रे रसेलला 12 कोटी, वरुण चक्रवर्तीला 8 कोटी आणि व्यंकटेश अय्यरला 8 कोटी आणि सुनिल नारायणला ६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या चार खेळाडूंवर केकेआरने 42 कोटी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे त्यांना लिलावात 48 कोटी रुपये वापरता येणार आहेत.

जर एखाद्या टीमने 4 खेळाडू रिटेन केले तर त्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागतील.

एखाद्या टीमने तीन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूसाठी 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 7 कोटी रुपये द्यावे लागतील. दोन खेळाडू कायम ठेवले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी तसंच एकच खेळाडू कायम ठेवला तर त्याला 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, KKR