मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Retention 2022 : CSK मध्ये ऋतुराजला मोठी जबाबदारी, धोनीने मित्रालाच दाखवला बाहेरचा रस्ता

IPL Retention 2022 : CSK मध्ये ऋतुराजला मोठी जबाबदारी, धोनीने मित्रालाच दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे.

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे.

आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 साठी (IPL Players Retention 2022) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. सीएसकेने रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), एमएस धोनी (MS Dhoni), मोईन अली (Moeen Ali) आणि ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) कायम ठेवलं आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने या रिटेनशनमध्ये मोठं मन दाखवलं आहे. चेन्नईने रिटेन केलेला धोनी हा दुसरा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला कमी किंमत मिळाली आहे. चेन्नईची टीम जडेजाला 16 कोटी, धोनीला 12 कोटी, मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटी रुपये देणार आहे. चेन्नईने या खेळाडूंवर 42 कोटी रुपये खर्च केल्यामुळे चेन्नईकडे आता लिलावात खर्च करण्यासाठी 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.

एमएस धोनीने त्याच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर चेन्नईला 4 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं, पण यामध्ये धोनीचे हुकमी एक्के असणाऱ्या खेळाडूंवरच त्याने आता विश्वास दाखवला नाही.

मिस्टर आयपीएल म्हणून ओळख मिळवलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) चेन्नईसाठी ऐतिहासिक खेळी केल्या. रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 5,528 रन केले. फक्त एक फायनल सोडली तर रैना सीएसकेने खेळलेल्या सगळ्या फायनलमध्ये खेळला, यावेळी मात्र चेन्नईने रैनाला रिटेन केलं नाही.

फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) एकट्याच्या जीवावर चेन्नईला आयपीएल 2021 ची फायनल जिंकवून दिली होती. फायनलमध्ये डुप्लेसिसने 86 रनची खेळी केली. आयपीएलमध्ये त्याने एकूण 100 मॅच खेळून 2,935 रन केले आहेत. असं असलं तरी चेन्नईने फाफ डुप्लेसिसला रिटेन केलं नाही. याशिवाय चेन्नईने शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांनाही टीममध्ये ठेवलं नाही.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक टीम जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करू शकत होती. यात 3 भारतीय आणि 1 परदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 परदेशी खेळाडू रिटेन करायला परवानगी होती.

रिटेनच्या नियमानुसार 4 खेळाडू रिटेन केलेल्या टीमला पहिल्या खेळाडूसाठी 16 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 12 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूसाठी 8 कोटी रुपये आणि चौथ्या खेळाडूसाठी 6 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. दोन खेळाडू रिटेन केले तर पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी, तसंच एक खेळाडू रिटेन केलं तर 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. अनकॅप खेळाडू रिटेन केला तर त्याच्यासाठी 4 कोटी रुपये टीमला खर्च करावे लागणार आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction