Home /News /sport /

IPL 2022 : ज्या खेळाडूंनी CSK ला बनवलं चॅम्पियन, त्यांनाच धोनी देणार 'धोका'!

IPL 2022 : ज्या खेळाडूंनी CSK ला बनवलं चॅम्पियन, त्यांनाच धोनी देणार 'धोका'!

आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) साठी प्रत्येक टीम त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सनेही (CSK) त्यांचे 4 खेळाडू निश्चित केले आहेत.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : आयपीएल 2022 (IPL Players Retention 2022) साठी प्रत्येक टीम त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहे. चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सनेही (CSK) त्यांचे 4 खेळाडू निश्चित केले आहेत, पण यामध्ये अशा दोन खेळाडूंचा समावेश नाही, ज्यांनी चेन्नईला अनेकवेळा चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईने एमएस धोनी (MS Dhoni), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीला (Moeen Ali) रिटेन केलं आहे. एमएस धोनीने त्याच्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर चेन्नईला 4 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं, पण यामध्ये धोनीचे हुकमी एक्के असणाऱ्या खेळाडूंवरच त्याने आता विश्वास दाखवला नाही. मिस्टर आयपीएल म्हणून ओळख मिळवलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) चेन्नईसाठी ऐतिहासिक खेळी केल्या. रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 5,528 रन केले. फक्त एक फायनल सोडली तर रैना सीएसकेने खेळलेल्या सगळ्या फायनलमध्ये खेळला, यावेळी मात्र चेन्नईने रैनाला रिटेन केलं नाही. फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) एकट्याच्या जीवावर चेन्नईला आयपीएल 2021 ची फायनल जिंकवून दिली होती. फायनलमध्ये डुप्लेसिसने 86 रनची खेळी केली. आयपीएलमध्ये त्याने एकूण 100 मॅच खेळून 2,935 रन केले आहेत. असं असलं तरी चेन्नईने फाफ डुप्लेसिसला रिटेन केलं नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या