रोहितच्या मुंबई इंडियन्सकडून 'विराट'सेनेचा धुव्वा, रोमहर्षक लढतीत 6 धावांनी विजय

रोहितच्या मुंबई इंडियन्सकडून 'विराट'सेनेचा धुव्वा, रोमहर्षक लढतीत 6 धावांनी विजय

मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी केली तर शेवटी अष्टपैलू हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी करत 32 धावा केल्या.

  • Share this:

बंगळुरू, 28 मार्च : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा पराभव केला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 धावांनी विजय मिळवला आहे.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इडियन्सने 187 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी केली तर शेवटी अष्टपैलू हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी करत 32 धावा केल्या.

मुंबईने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या टीमनेही जोरदार लढत दिली. परंतु त्यांना मुंबईने दिलेल्या आव्हान गाठणं शक्य झालं नाही. बंगळुरूचा डाव 20 षटकांत पाच बाद 181 धावांवर आटोपला. अखेर मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला.

First published: March 29, 2019, 12:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading