IPL : मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता, जाणून घ्या कारण

IPL : मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता, जाणून घ्या कारण

आयपीएलमध्ये सर्वाधिक चारवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत एका खेळाडूला संघातून वगळलं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : इंडियन प्रीमियर लीग 2019 चे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सने लेग स्पिनर मयंक मार्कंडेयला करारमुक्त केलं आहे. चार वेळा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससोबत करार करताना मयंकच्या जागी अष्टपैलू खेळाडू शेर्फन रुदरफोर्डला संघात घेतलं आहे. रुदरफोर्ड त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

मयंक मार्कंडेयला करारमुक्त केल्यानंतर मुंबई इंडियन्सचे संघमालक आकाश अंबानींनी सांगितले की, मयंकला त्याच्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा. तो एक चांगला खेळाडू आहे. तो भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा असून नेहमीच मुंबई इंडियन्सचा भाग राहिल.

पंजाबचा असलेला मयंक मार्कंडेय 2018 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला होता. 2018 च्या हंगामात त्यानं 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. तर यंदा त्याला फक्त 3 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यात एकही विकेट त्याला घेता आली नाही.

शेर्फन रुदरफोर्डने यंदाच्या हंगामात दिल्लीकडून पदार्पण केले. त्याने 7 सामन्यात 73 धावा केल्या. तर गोलंदाजीत फक्त एक विकेट घेता आली. जरी त्यानं मोठी कामगिरी केली नसली तर सामना बदलण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याने कॅरेबियन लीगमध्ये गयानाकडून खेळताना 13 चेंडूत 45 धावा केल्या होत्या.

शास्त्रींचा पत्ता होणार कट? प्रशिक्षकासाठी 'हे' दिग्गज शर्यतीत

'अनलकी शॉ' आर्चरचे ट्वीट, पृथ्वीच्या बंदीवर 4 वर्षांपूर्वीच केलं होतं भाकीत?

मुख्यमंत्र्यांनी सांगितला राष्ट्रवादी-काँग्रेसला फोडण्याचा फॉर्म्युला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या