मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Mega Auction 2022 : आयपीएल लिलावाची तारीख ठरली, दोन दिवस पडणार पैशांचा पाऊस!

IPL Mega Auction 2022 : आयपीएल लिलावाची तारीख ठरली, दोन दिवस पडणार पैशांचा पाऊस!

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) होणार आहे.

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) होणार आहे.

जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) होणार आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 22 डिसेंबर : जगातली सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) होणार आहे. या लिलावाची तारीख आता समोर आली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी याबाबतची माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडली नाही, तर यावेळचा लिलाव बंगळुरूमध्ये होईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. आयपीएलमधला हा अखेरचा लिलाव असू शकतो, कारण बहुतेक टीम आता लिलाव बंद करण्याच्या मताच्या आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आयपीएलचा लिलाव पुढच्या वर्षी 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे. कोरोनामुळे स्थिती खराब झाली नाही तर लिलाव भारतामध्येच होईल. दोन दिवसांच्या या लिलावासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलचा लिलाव युएईमध्ये होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण बीसीसीआयची अशी कोणतीही योजना नाही. कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे परदेश यात्रेर निर्बंध येऊ शकतात, त्यामुळे हा लिलाव भारतात करणं सोपं आहे. यावर्षी आयपीएलमध्ये 10 टीम सहभागी होणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबादची टीम स्पर्धेत नव्याने दाखल झाल्या आहेत. लखनऊ आणि अहमदाबादकडे ड्राफ्टमधून प्रत्येकी 3-3 खेळाडू निवडण्याची मुभा आहे. ख्रिसमसपर्यंत या खेळाडूंची निवड करायला या दोन्ही टीमना सांगितलं होतं, पण अहमदाबादची मालकी असलेल्या सीव्हीसी कॅपिटलला अजूनही बीसीसीआयची परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे हा वेळ वाढवला जाण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या बहुतेक टीमनी प्रत्येक तीन वर्षांनी होणाऱ्या लिलावामुळे टीमचं संतुलन बिघडतं, अशी तक्रार केली आहे. टीम बनवण्यासाठी एवढी मेहनत केल्यानंतर खेळाडूंना सोडणं खूप कठीण असतं, अशी प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी दिली.
First published:

Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

पुढील बातम्या