IPL 2019 : निवडणूक आयोग करणार आयपीएलचा 'असा' वापर

IPL 2019  : निवडणूक आयोग करणार आयपीएलचा 'असा' वापर

11 एप्रिलपासून निवडणुकांना सुरूवात होत आहे, त्याकरिता उमेदवारांनी तर प्रचारासाठी कंबर कसली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 एप्रिल : लोकसभा निवडणुक आणि आयपीएल या दोन्हीचा ज्वर आता वाढत चालला आहे. एकीकडं नेत्यांच्या आणि उमेदवारांच्या प्रचाराला जोर आला आहे तर, दुसरीकडं आयपीएलच्या मैदानावर रोज नवनवीन रेकॉर्ड होत आहे.

आता मात्र, निवडणुक आयोग आपल्या फायद्यासाठी आयपीएलचा वापर करणार आहे. आयोगानं मतदारांमध्ये मतदानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी एक अनोखी युक्ती शोधून काढली आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामाला 3 एप्रिलपासून सुरुवात झाली. या सामन्यात निवडणुक आयोगानं जाहीरातींच्या स्वरुपात मतदारांना आवश्यक सामग्री दाखवली होती. निवडणुक अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, याआधी निवडणुक अधिकाऱ्यांनी क्रिकेट बोर्डशी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत अभियान राबवण्यासंबंधी चर्चा केली होती. यात बीसीसीआयनंही मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळं मुंबईमध्ये वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात प्रेक्षकांनी मतादान करण्यासाठी जागृत व्हावे, याकरिता विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

तसेच, आयपीएलमध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्येही या अभियानाचा वापर केला जाणार आहे. 11 एप्रिलपासून निवडणुकांना सुरूवात होत आहे, त्याकरिता उमेदवारांनी तर प्रचारासाठी कंबर कसली आहेच आता, निवडणुक आयोगही मतदारांना जागरूक करण्यास सज्ज आहे.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading