Home /News /sport /

MI vs RCB : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; हार्दीक पंड्या परतला

MI vs RCB : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; हार्दीक पंड्या परतला

विराट कोहलीची टीम आरसीबी आज प्रथम फलंदाजी करेल. हार्दीक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आरसीबीमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. टीम डेव्हिड, नवदीप सैनी आणि वनिंदू हसरंगाच्या जागी डॅनियल ख्रिश्चन, शाहबाज अहमद आणि केली जेमसन खेळत आहेत.

पुढे वाचा ...
    आबुधाबी, 26 सप्टेंबर : IPL 2021 चा 39 वा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीची टीम आरसीबी आज प्रथम फलंदाजी करेल. हार्दीक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आरसीबीमध्ये तीन बदल करण्यात आले आहेत. टीम डेव्हिड, नवदीप सैनी आणि वनिंदू हसरंगाच्या जागी डॅनियल ख्रिश्चन, शाहबाज अहमद आणि केली जेमसन खेळत आहेत. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कर्णधार पदाचा कस लागणार आहे. या दोघांनाही संघाचा खराब फॉर्म मागे ठाकून आपापल्या संघांची कामगिरी सुधारण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. RCB अजूनही नऊ सामन्यांतून 10 गुणांसह पहिल्या चारमध्ये आहे, तर सलग दोन पराभवानंतर मुंबई नऊ सामन्यांतून आठ गुणांसह सहाव्या स्थानावर घसरली आहे. संघ असे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (c), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (w), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद, डॅनियल ख्रिश्चन, केली जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल हे वाचा - IPL 2021, MI vs RCB: क्रिकेट फॅन्ससाठी Super Sunday, टीम इंडियाचे 2 कॅप्टन आमने-सामने मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (c), क्विंटन डी कॉक (w), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, अॅडम मिल्ले, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl, IPL 2021, Mumbai Indians, RCB

    पुढील बातम्या