• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • दिल्लीचा राजस्थानवर 33 धावांनी विजय; कर्णधार संजू सॅमसनची 70 धावांची खेळी व्यर्थ

दिल्लीचा राजस्थानवर 33 धावांनी विजय; कर्णधार संजू सॅमसनची 70 धावांची खेळी व्यर्थ

राजस्थानचा (Rajasthan Royals) संघ 121 धावांवर ढेपाळला. कर्णधार संजू सॅमसनने एकट्यानं 70 धावांची खेळी केली, मात्र दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही.

 • Share this:
  अबुधाबी, 25 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) संघाने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा (Rajasthan Royals) संघ 121 धावांवर ढेपाळला. कर्णधार संजू सॅमसनने एकट्यानं 70 धावांची खेळी केली, मात्र दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. त्याच्या व्यतिरिक्त महिपाल लोमरोर याच्या 19 धावा वगळता राजस्थानच्या फलंदाजी केलेल्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेमध्ये चेन्नईला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर गेला आहे. दिल्लीकडून एनरिक नॉर्टजेने 2, आवेश खान, अश्विन, कागिसो राबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. राजस्थान कर्णधार संजू सॅमसनने 53 चेंडूत 70 धावांची खेळी केली, यात त्याने शानदार 8 चौकार आणि षटकार लगावला. राजस्थानची सुरुवातच खराब झाली. संघाच्या 6 धावा झाल्या असतानाच दोन्ही सलामीवर तंबूत दाखल झाले. त्यानंतर डेविड मिलरही 7 धावांवर बाद झाल्यानं राजस्थानची स्थिती 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर मात्र कर्णधार सॅमसनने महिपालला साथीला घेत काहीकाळी संघाची पडझड होऊ दिली नाही. हे वाचा - LIVE Updates: क्रिकेटच्या बाबतीत मी स्वत:ला मुंबईकर म्हणवतो – शरद पवार मात्र, संघाच्या अर्धशतकाला 2 धावा कमी असताना महिपाल बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन दुसऱ्या बाजूने साथ मिळालीच नाही, मधली फळी ढेपाळल्यामुळे राजस्थानचा संघ 20 षटकात 121 धावांवरच आटोपला. तत्पूर्वी, श्रेयश अय्यर (43), कर्णधार ऋषभ पंत (24) आणि हेटमायरने केलेल्या (28) धावांच्या जोरावर दिल्लीच्या संघाने समाधानकारक धावसंख्या उभा केली. सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन आजच्या सामन्यातही फारशी चमक दाखवू शकले नाही. तर गोलंदाजीमध्ये राजस्थानकडून मुस्तफिजूर आणि चेतन साकरिया यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले तर कार्तिक त्यागी आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
  Published by:News18 Desk
  First published: