IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव! आजची मॅच रद्द होणार?

IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव! आजची मॅच रद्द होणार?

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतही (IPL 2021) कोरोनाचा शिरकाव झाल्याची ताजी घटना उघड झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमशी संबंधित काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे सोमवारी होणारी मॅच रद्द होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 3 मे: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतही (IPL 2021) कोरोनाचा शिरकाव झाल्याची ताजी घटना उघड झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमशी संबंधित काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे सोमवारी होणारी मॅच रद्द होण्याची शक्यता आहे, असं वृत्त 'क्रिकबझ'नं दिलं आहे. आज होणारी मॅच काही दिवसांनी नव्या वेळापत्रकानुसार होण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. आरसीबीची टीम सध्या पॉईंट टेबलवर तिसऱ्या क्रमांकावर असून कोलकाताची टीम सातव्या क्रमांकावर आहे. कोलकाता टीममधील कोणत्या सदस्याला कोरोनाची लागण झालीय हे अजून समजलेलं नाही. मात्र या प्रकारे मॅच रद्द झाल्यास ही आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. यापूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मॅच कोरोनामुळे रद्द झाली होती.

यापूर्वीही झाली होती कोरोनाची लागण

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीपासून वेगवेगळ्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) देवदत्त पडिक्कल, दिल्ली कॅपिटल्सचा (DC) अक्षर पटेल, कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) नितिश राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हे खेळाडू काही काळ आयसोलेशनमध्ये होते. त्यांचा आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा एकदा टीममध्ये दाखल झाले.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 12:13 PM IST

ताज्या बातम्या