• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • RCB vs CSK Live : आरसीबीच्या सलामी जोडीचा जलवा; विराट, देवदत्तचे शानदार अर्धशतक

RCB vs CSK Live : आरसीबीच्या सलामी जोडीचा जलवा; विराट, देवदत्तचे शानदार अर्धशतक

चेन्नईच्या जवळपास सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत या सलामी जोडीनं चौकार-षटकारांची टोलेबाजी सुरू ठेवली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनीही अर्धशतके झळकावली. अखेर 53 धावांवर विराट कोहली बाद झाला.

  • Share this:
    शारजा, 24 सप्टेंबर : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या आरसीबीने दमदार खेळी करण्यास सुरुवात केली. सलामीवीर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. चेन्नईच्या जवळपास सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत या सलामी जोडीनं चौकार-षटकारांची टोलेबाजी सुरू ठेवली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनीही अर्धशतके झळकावली. अखेर 53 धावांवर विराट कोहली बाद झाला. विराटने 41 चेंडूंत 53 धावांच्या खेळीत शानदार 6 चौकार आणि 1 षटकार खेचला. डेव्हेन ब्रॅव्होच्या गोलंदाजीवर तो रवींद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. विराटनंतर पडिक्कल जोडीला एबी डिव्हिलियर्स मैदानात उतरला आहे. 16 षटकांचा खेळ पूर्ण झाला तेव्हा पडिक्कल 67 धावांवर नाबाद खेळत होता. हे वाचा - हार्दिक पंड्या कुठे झाला गायब? Mumbai Indians च्या बॉलिंग कोचने दिलं उत्तर तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या संघातील चुरस क्रीडा प्रेमींना पाहायला मिळत आहे. सामन्यासाठी निर्धारित वेळेत होणारी नाणेफेक 10 मिनिटे पुढे ढकलण्यात आली  होती. शारजामध्ये धुळीच्या वादळामुळे नाणेफेकीला काहीसा वेळ लागला. संघ असे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टीम डेव्हिड, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल हे वाचा - RCB vs CSK Live : टॉसच्या आधीच धुळीचं वादळ! चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा निर्णय चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड
    Published by:News18 Desk
    First published: