S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

IPL 2019 : रसेलच्या तुफान खेळीनं हैदराबादची दाणादाण, कोलकाताचा सनसनाटी विजय

आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलनं केवळ 20 बॉलमध्ये आपले अर्धशत पुर्ण केले.

Updated On: Mar 24, 2019 08:24 PM IST

IPL 2019 : रसेलच्या तुफान खेळीनं हैदराबादची दाणादाण, कोलकाताचा सनसनाटी विजय

कोलकत्ता, 24 मार्च : कोलकता आणि हैदराबाद यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, आंद्रे रसेल या धडाकेबाज फलंदाजाच्या तुफान खेळीनंतर कोलकताने हैदराबादवर विजय मिळवला. रसेलनं केवळ 19 बॉलमध्ये 49 धावा केल्या. त्याच्या या इनिंगमध्ये रसेलनं चार चौकार आणि चार षटकारांची धुवाधार खेळी केली. रसेलच्या पुर्ण करत. हैदराबादच्या गोलंदाजांची पिसं काढली. तर, नितीश राणा या युवा खेळाडूच्या अर्धशतकामुळे कोलकताला विजयाच्या जवळ आणले. रसेल आणि नितीश राणा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.


हैदराबादनं कोलकताला 182 धावांचे आव्हान दिले होते. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबाद संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावलेले पाहायला मिळत होते. आपला कमबॅक करत वॉर्नरनं 85 धावा केल्या होत्या. मात्र त्याचे प्रयत्न रसेलनं निष्फळ ठरवत, शेवटचे दोन चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकवला. दिनेश कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकता संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: ipl 2019
First Published: Mar 24, 2019 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close