स्पोर्ट्स

  • associate partner

IPL खेळण्यासाठी उतावळा झाला पाक खेळाडू, 12 वर्षांपूर्वी सचिनला केलं होतं बाद

IPL खेळण्यासाठी उतावळा झाला पाक खेळाडू, 12 वर्षांपूर्वी सचिनला केलं होतं बाद

पाक खेळाडूला भारतात खेळायचे आहे क्रिकेट, IPL खेळण्यासाठी हट्ट धरला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 30 जानेवारी : इंडियन इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) तेराव्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत खेळला जाईल. 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यापासून ही स्पर्धा जगातील पहिल्या क्रमांकाची क्रिकेट लीग आहे. त्यामुळं जगभरातील सर्वच खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक असतात. मात्र 2008 आयपीएलनंतर पाकिस्तानी खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही पाक खेळाडू पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी परवानगी मागत आहेत.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आयपीएलच्या पहिला सत्रात सहभागी झालेल्या काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोहेल तन्वीर आयपीएल 2008मध्ये ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघात होता. आता सोहेलला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळायचे आहे. एवढेच नाही तर भारतात क्रिकेट खेळण्यासाठी सोहेल उतावळा झाला आहे.

वाचा-IPLमध्ये धोनी, रोहित आणि विराट एकाच टीममध्ये खेळणार! गांगुलीचा मास्टर प्लॅन

11 सामन्यात घेतल्या होत्या 22 विकेट

सोहेलला (Sohail Tanvir) राजस्‍थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने 2008मध्ये एक कोटींना विकत घेतले होते. पहिल्याच हंगामात सोहेलनं जबरदस्त कामगिरी केली. या पाकिस्तानी जलद गोलंदाजाने 11 सामन्यात 22 विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. 2008मध्ये पहिल्या हंगामातच राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळाले होते. या विजयात सोहेलचे महत्त्वपूर्ण योगदान होते. सोहेलनं मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बाद केले होते.

वाचा-सानिया नेहवालचा भाजप प्रवेश, बॅडमिंटन कोर्टमधून आता थेट राजकारणात

IPL जगातली सर्वोत्तम टी-20 लीग

पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने नुकत्याच एका कार्यक्रमात, आयपीएलच्या पहिल्या हंगामानंतर खेळण्याची संधी न मिळाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच, जगात असा क्रिकेटपटू नाही ज्याला या लीगमध्ये खेळायला आवडत नाही, असेही म्हणाला. सोहेलनं यावेळी, 'एक क्रिकेटर म्हणून मला आणि इतर पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळता येत नाही याची खंत आहे. आयपीएल खरंच जगातील सर्वोत्तम लीग आहे’, असे सांगितले. त्याचबरोबर आशिया चषक आणि टी -20 विश्वचषकात पाकिस्तान संघात निवड होण्याची आशा सोडली नसल्याचेही स्पष्ट केले.

वाचा-ऐतिहासिक विक्रम रचत युवा ब्रिगेडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट

पाक संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक

ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर 2021मध्ये भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्यामुळं या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी संघाकडून खेळण्याची इच्छा तन्वीरनं व्यक्त केली. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी सोहेलची संघात निवड करण्यात आलेली नाही. मात्र असे असले तरी, लवकरच संघात जागा मिळेल, अशी अपेक्षा सोहेलनं व्यक्त केली आहे.

First published: January 30, 2020, 9:51 AM IST

ताज्या बातम्या