Home /News /sport /

IPL 2022: ...तर शुभमन गिलऐवजी इशान किशनला लागली असती नव्या संघाची लॉटरी

IPL 2022: ...तर शुभमन गिलऐवजी इशान किशनला लागली असती नव्या संघाची लॉटरी

Ishan Kishan

Ishan Kishan

आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात12 आणि 13तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. . अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार आहेत.

  नवी दिल्ली, 18 जानेवारी: आयपीएल 2022 (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात12 आणि 13तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. . अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार आहेत. दरम्यान, अहमदाबादने (Ahmedabad franchises) हार्दिक पंड्या(Hardik Pandya), राशिद खान(Rashid Khan) आणि शुबमन गिल(Shubman Gill)या त्रिमूर्ती’ची निवड आपल्या संघासाठी केली आहे. तत्पूर्वी, क्रिकेट जगतात इशान किशनच्या (Ishan Kishan) नावाची चर्चा रंगली होती. अहमदाबाद संघाची शुबमन गिल(Shubman Gill) पूर्वी तिसरा खेळाडू म्हणून इशान किशनला पहिली पसंती होती. अशी माहिती समोर आली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवरुन एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादला इशान किशन संघात हवा होता. पण त्याला पुन्हा लिलावात जाण्याची इच्छा आहे. अशी माहिती समोर आली. मुंबई इंडियन्स त्याच्यासाठी मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. IPL 2022: ठरलं! अहमदाबादने संघाने केली या ‘त्रिमूर्ती’ची निवड, पांड्यासह राशिद खानही होणार मालामाल
   मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या , सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट प्रदर्शन केलेला राशिद खान आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल हे पुढच्या हंगामात अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसतील.
  अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन संघांना 22 जानेवारीपर्यंत त्यांच्या तीन कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहेत. अहमदाबादने हार्दिक आणि राशिदला प्रत्येकी 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर युवा शुबमन गिलला अहमदाबाद फ्रेंचायझीत सहभागी होण्यासाठी सात करोड रुपये दिले जाणार आहेत. इशान किशन आतापर्यंत आयपीएलमध्ये गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स या दोनच संघांकडून खेळला आहे. आयपीएल 2020 दरम्यान, तो सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होता. त्यानंतर त्याने 30 षटकार मारत 516 हून अधिक धावा केल्या होत्या. या खेळामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. तो आक्रमक फलंदाज आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Ishan kishan, Mumbai Indians

  पुढील बातम्या