मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 रिटेन्शन पॉलिसीबाबत महत्त्वाची माहिती समोर; CSKच्या चाहत्यांना दिलासा

IPL 2022 रिटेन्शन पॉलिसीबाबत महत्त्वाची माहिती समोर; CSKच्या चाहत्यांना दिलासा

CSK

CSK

आयपीएल 2022 (IPL 2022)साठी खेळाडूंच्या रिटेन्शन(retentions) पॉलिसीबाबत ग्रीन सिग्नल मिळाला असून सध्याच्या आठ फ्रेंचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022 Mega Auction)लिलावासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएल 2022  साठी खेळाडूंच्या रिटेन्शन(retentions) पॉलिसीबाबत ग्रीन सिग्नल मिळाला असून सध्याच्या आठ फ्रेंचायझींना जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज (CSK)संघाच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डू प्लेसिस (Faf Du plessis) किंवा ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) या दोघांना सीएसकेमध्ये आयपीएल 2022 साठी रिटेन केले जाण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल संघांना मेगा लिलावासाठी आरटीएम कार्ड मिळण्याची शक्यता नाही. क्रिकबझच्या अहवालानुसार, यूएईमध्ये नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या काही अंतिम दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. यावर सर्व पक्षांचे एकमत झाल्याचे मानले जाते. यापूर्वी, क्रिकबझने म्हटले होते की, एका संघाला जास्तीत जास्त तीन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल, एकूण संख्या चारपेक्षा जास्त नसेल. अनकॅप्ड खेळाडू ठेवण्याची मर्यादा देखील असू शकते. एका टीमला दोनपेक्षा जास्त अनकॅप्ड खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन नवीन संघांच्या विक्रीनंतर लवकरच रिटेन्शन पॉलिसीची औपचारिक घोषणा केली जाईल. 22 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरदरम्यान ही घोषणा होण्याची शक्यता आहे. काही बोली लावणारे पक्ष दुबईला पोहोचले आहेत. आयपीएल फ्रेंचाइजीकडे जास्तीत जास्त 90 कोटी रुपयांची पर्स आहे. म्हणजेच, कोणतीही फ्रेंचायझी आपली टीम बनवण्यासाठी खेळाडूंवर जास्तीत जास्त 90 कोटी रुपये खर्च करू शकते. आयपीएल 2022 मध्ये ही रक्कम 90 कोटी वरून 95 कोटी किंवा 100 कोटी पर्यंत वाढवली जाऊ शकते.
First published:

Tags: Csk, Ipl 2022, Ipl 2022 auction, MS Dhoni, Ravindra jadeja

पुढील बातम्या