मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /विराटसोबत खेळलेला क्रिकेटपटू म्हणतो, IPL पेक्षा PSL भारी, कारण...!

विराटसोबत खेळलेला क्रिकेटपटू म्हणतो, IPL पेक्षा PSL भारी, कारण...!

पाकिस्तान सुपर लीग (PSL) खेळण्यासाठी बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) देखील पीएसएलमध्ये खेळत आहे, पण या स्पर्धेत खेळताना स्टेनने आयपीएल (IPL) वर टीका केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 मार्च : पाकिस्तान सुपर लीग (PSL) खेळण्यासाठी बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) देखील पीएसएलमध्ये खेळत आहे, पण या स्पर्धेत खेळताना स्टेनने आयपीएल (IPL) वर टीका केली आहे. क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना स्टेन म्हणाला, आयपीएलमध्य क्रिकेटपेक्षा पैशांकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण पीएसएलमध्ये क्रिकेटला महत्त्व दिलं जातं. आयपीएलमध्ये स्टेन 11 मोसम खेळला आहे.

'आयपीएल खेळायला जातो तेव्हा तिकडे एवढी मोठी नावं असतात, त्यांच्या कमाईवरच जास्त जोर दिला जातो. या सगळ्यात क्रिकेटला विसरलं जातं. पण तुम्ही पीएसएल किंवा लंका प्रीमियर लीगमध्ये खेळत असाल, तर सगळं लक्ष क्रिकेटवर असतं. मी पीएसएल बऱ्याच कालावधीपासून खेळत आहे. लोकं माझ्याकडे येतात, तेव्हा फक्त क्रिकेटबाबत बोलतात, पण आयपीएलमध्ये तुम्हाला मोसमासाठी किती पैसे मिळाले, असं लोकं विचारतात. यापासून मला लांब राहायचं होतं आणि खेळावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. आयपीएलमध्ये खेळाडूंची किंमत बाकी सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते, म्हणून आपण आयपीएलमधून माघार घेतली,' असं डेल स्टेनने सांगितलं.

आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर बँगलोरने स्टेनला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलवर टीका केली असली तरी स्टेन या स्पर्धेचे 11 मोसम खेळला. 95 मॅचमध्ये त्याने 97 विकेटही घेतल्या. 8 रन देऊन 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. मागच्या मोसमात स्टेनला फक्त तीन मॅच खेळायला मिळाल्या होत्या. तर मागच्या 3 आयपीएलमध्ये तो फक्त 6 मॅच खेळला होता. 2013 साली त्याने सर्वाधिक 17 मॅच खेळल्या होत्या.

First published:

Tags: Cricket, IPL 2021