IPL 2019 : धोनी विरुद्ध कोहलीच्या सामन्यात कोण मारणार बाजी, कुणाचं पारडं जड?

IPL 2019 : धोनी विरुद्ध कोहलीच्या सामन्यात कोण मारणार बाजी, कुणाचं पारडं जड?

विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला विजयाची आस लागली आहे तर चेन्नई आणि बंगळुरू या दोन्ही संघाचा इतिहास पाहता, चेन्नई संघांचेच पारडे जास्त जड दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 22 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामाला आजपासून सुरूवात होणार आहे आणि यंदा हा सामना रंगणार आहे तो गजविजेत्या चेन्नई आणि गेल्या दहा वर्षात चोकर्स असलेले बंगळुरू यांच्यात. दोन वर्षांच्या बंदीनंतर 2018 साली कमबॅक केलेल्या चेन्नआ संघाने आल्या आल्याच ऐटीत जेतेपद जिंकत, आपणच यंदाचे प्रबळ दावेदार आहोत, हे सुध्दा दाखवून दिले. चेन्नई आणि बंगळुरू या दोन्ही संघाचा इतिहास पाहता, चेन्नई संघांचेच पारडे जास्त जड दिसत आहे. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहे, यांपैकी 15 सामन्यांमध्ये चेन्नईने एकहाती विजय मिळवला आहे, तर बंगळुरूला सात सामने जिंकता आलेले आहेत, यामध्ये केवळ एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.

एकूण सामने: 23*

चेन्नई विजयी: 15

बंगळुरू विजयी : 7

निकाल नाही: 1.

चेन्नईसाठी होम ग्राऊंड लकी

चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. कारण या दोन्ही संघांमध्ये चेन्नईमध्ये सात सामने खेळले गेले. या सात सामन्यांपैकी तब्बल सहावेळा चेन्नईने बंगळुरूवर विजय मिळवला आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या चॅलेंजर्सना धोनीच्या किंग्जना घरच्या मैदानावर हरवणे कठीण जाणार आहे.

हे खेळाडू असतील गेम चेंजर्स

धोनी आणि कोहली यांच्यात होणारा सामना हा हाय वोल्टेज सामना असणार यात काही वाद नाही. आतापर्यंत दोन्ही संघांतील सामन्यांमध्ये सर्वाधिक लढती चेन्नईच्या सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या नावावर आहेत. दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी 22 सामने खेळले आहेत. आणि आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे तर, विराट कोहली हा सर्वात फिनीशर म्हणून ओळखला जातो. याच बरोबर चेन्नईकरिता धोनी आणि बंगळुरू करिता एबी डिव्हिलियर्स हे दोन प्रमुख आणि गेम चेंजर्स फलंदाज ठरतील. बंगळुरु संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिमरॉन हेटमेयर, हिंमत सिंह अशी फलंदाजांची फळी आहे. तर चेन्नईमध्ये महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जाडेजा, सॅम बिलिंग, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन एवढे तगडे फलंदाज आहेत.

बंगळुरूला पहिल्या विजयाची आस

बंगळुरूने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तायंना अद्याप एकदाही आयपीएलचे चषक जिंकलेले नाही. असे असले तरी बंगळुरु संघाची खरी ताकदही फलंदाजीत आहे हे एवढ्या वर्षात स्पष्ट झाले असले तरी, चोकर्स या नावाने नावारुपाला आलेल्या विराटच्या चॅलर्जसना यंदा हा टॅग पुसण्याची यंदा चांगली संधी आहे. कारण या संघात यंदा आठ अष्टपैलू खेळाडू आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जाडेजा, सॅम बिलिंग, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, दीपक चहर, के एम आसीफ, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, ध्रुव शोराय, एन जगदीशन, शार्दूल ठाकूर, मोनू कुमार, चैतन्य बिशोनी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ

विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमेयर, शिवम दुबे, हिंमत सिंह, मोईन अली, मार्कस स्टोइनिस, नॅथन कुल्टर नाईल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, टीम साऊदी, पवन नेगी, मोहम्मद सिराज, हेनरिच क्लासेन, कोलिन डि ग्रांडहोमे, अक्षदीप नाथ, देवदत्त पी, गुरकीरत सिंह, , प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी.

First published: March 22, 2019, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading