Home /News /sport /

Captain Cool धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

Captain Cool धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

Captain Cool धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

Captain Cool धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (KKRvs CSK) यांच्यात फायनल मॅच आज होणार आहे. दरम्यान, क्रिकेट जगतात धोनीच्या एका विक्रमाची चर्चा सुरु झाली आहे. तो असा विक्रम आहे, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्यात फायनल मॅच आज होणार आहे. 3 वेळचा आयपीएल विजेता चेन्नई संघ आणि 2 वेळा चषक उंचावणारा कोलकाता संघ असल्याने आजच्या महामुकाबल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, क्रिकेट जगतात धोनीच्या एका विक्रमाची चर्चा सुरु झाली आहे. तो असा विक्रम आहे, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी या सामन्यासाठी मैदानावर उतरताच मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. कर्णधाराच्या रुपात धोनीचा हा ट्वेंटी ट्वेंटी स्वरुपातील तब्बल 300 वा सामना असेल. अर्थातच कोलकाताविरुद्धच्या अंतिम सामन्यातून धोनी त्याच्या ट्वेंटी ट्वेंटी स्वरुपातील सामना नेतृत्त्वांचे त्रिशतक पूर्ण करेल. ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला आणि एकमेव कर्णधार असेल. हे वाचा- KKR vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य तसेच, धोनीची आजची फायनल मॅच 10 वी आहे. त्याखाली दोन नंबरला रैना आहे. त्याने 8 फायनल मॅच खेळल्या आहेत. तर सीएसकेचा ड्वेन ब्राव्होने 6 IPL फायनल मॅच खेळल्या आहेत. तो अश्विनसह तिसऱ्या नंबरवर आहे. आतापर्यंत 299 ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका बजावली आहे. त्यापैकी तब्बल 176 सामने जिंकण्यात त्याला यश आले आहे. तर 118 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तो भारतीय टी20 संघ, चेन्नई सुपर किंग्ज, राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि इंडियन्स या संघांचा संघनायक राहिला आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाने 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर याच संघाला त्याने टी20 चँपियन्स लीगमध्ये 2 वेळा विजेते बनवले आहे. याखेरीज त्याच्या खात्यात आयसीसीची टी२० विश्वचषक ट्रॉफीही जमा आहे. हे वाचा-धोनी सर्वात मोठ्या खेळाडूला संधी देणार का? अशी असेल CSK ची Playing 11 त्यामुळे हा महत्त्वपूर्ण सामना अविस्मरणीय बनवण्याकडे धोनीचा कल असेल. चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील आकडेवारी पाहता, चेन्नईचेच पारडे जड दिसते. त्यामुळे चेन्नईने हा सामना जिंकण्याच्या दाट शक्यताही आहेत. अशात धोनी त्याचा 300 वा ट्वेंटी ट्वेंटी सामना विजयासह संपवतो की पराभवासह, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या