IPLमध्ये होणार पुण्याची एण्ट्री? असा बदलणार फॉरमॅट

बीसीसीआयने आयपीएलमध्ये संघ संख्या वाढवण्यासाठी ब्लू प्रिंटही तयार केली आहे. 2021पासून हे संघ आयपीएल खेळतील.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 04:26 PM IST

IPLमध्ये होणार पुण्याची एण्ट्री? असा बदलणार फॉरमॅट

मुंबई, 14 जुलै : ICC Cricket World Cupनंतर आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे ते आयपीएल 2020कडे. आयपीएल 2019मध्ये मुंबई इंडियन्स संघांना बाजी मारली, मात्र आयपीएल 2020 महेंद्रसिंग धोनीसाठी शेवटचा असू शकतो. यातच आता आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दहा संघांमध्ये ठसन पाहायला मिळू शकते. बीसीसीआय पुन्हा एकदा आयपीएल खेळणाऱ्या संघांची संख्या 8 वरून 10 करण्याच्या विचारात आहे.

याआधी पुणे सुपरजायंट्स आणि कोची टसकर्स या 2 संघांचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 2017मध्ये या संघांना काढून गुजरात लायन्स या संघाला स्पर्धेत सामिल करण्यात आले. दरम्यान आता नव्या दोन संघांसाठी टाटा (रांची, जमशेदपूर), अदानी ग्रुप ( अहमदबाद) आणि आरपीजी संजीव गोयंका ( पुणे) यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयनं 2010च्या आयपीएलमध्ये 10 संघाचा फॉर्म्युला आजमावला होता. पण, विवादानंतर हा फॉर्म्युला रद्द करण्यात आला.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आयपीएलमध्ये संघ संख्या वाढवण्यासाठी ब्लू प्रिंटही तयार केली आहे. सध्या या प्रक्रियेच्या टेंडर संदर्भात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल संघमालक आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये लंडनमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत 2020च्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला आणि 2021मध्ये हे संघ खेळतील.

पुण्याची पुन्हा होणार एण्ट्री

2016-17मध्ये पुणे सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्या संघानं आयपीएलमध्ये सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. मात्र त्यानंतर आयपीएलमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, दरम्यान आता पुन्हा पुणे संघ आयपीएलमध्ये कमबॅकसाठी सज्ज आहे. तर, अदानी ग्रुपचा 2010 साली अहमदाबाद फ्रँचायझी विकत घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. आता पुन्हा एकदा त्यांनी कंबर कसली आहे. यांच्याव्यतिरिक्त टाटा समूहीही जमशेजपूरची फ्रँचायझी उतरवण्यासाठी सज्ज आहेत.

Loading...

वाचा-  World Cup फायनलमध्ये हिटमॅनचं आणखी एक स्वप्न भंगणार?

वाचा-  World Cup फायनल न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये पण नजर सचिनच्या विक्रमावर!

वाचा-  धोनीसंदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, निवृत्तीबाबत झाला 'हा' निर्णय

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...