IPL 2019 : दहशत का दूसरा नाम धोनी, बेल्सही जमिनीवर पडायला घाबरले

IPL 2019 : दहशत का दूसरा नाम धोनी, बेल्सही जमिनीवर पडायला घाबरले

धोनीची गोलंदाजांवर असलेली दहशत तर, आपल्या सर्वांना माहितच आहे.

  • Share this:

चेन्नई, 31 मार्च : आयपीएलच्या बाराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई संघाने चांगली सुरूवात करत, सलग दोन सामने जिंकले. दरम्यान आज चेन्नईचा सामना राजस्थानशी आपल्या घरच्या मैदानावर होता. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8 धावांनी पराभव केला. यात सर्व श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जातं. चेपॉकवर राजस्थान विरोधात हल्लाबोल करत धोनीनं चेन्नईला सावरले. शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीनं सलग तीन षटकार मारत 153च्या स्ट्राईक रेटनं 75 धावा केल्या. आणि राजस्थानसमोर 176 धावांचे आव्हान ठेवलं.

या सामन्या दरम्यान एक अनोखा प्रसंग घडला. धोनीची गोलंदाजांवर असलेली दहशत तर, आपल्या सर्वांना माहितच आहे. पण आज पाचव्या षटकात आर्चरनं उत्कृष्ट गोलंदाजी करत धोनीला आऊट करण्याचा प्रयत्न सुरु केला, त्यात तो यशस्वी होणारच होता. मात्र, स्टम्पला बॉल लागूनही बेल्स खाली पडले नाहीत, त्यामुळं धोनी थोडक्यात वाचला. हे सगळं पाहून आर्चरसह राजस्थानचा संघ आश्चर्यचकित झाला.

राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत, अंबाती रायडूला एका धावावरच बाद केले. तर, वॉटसन आणि केदार जाधवही लवकर बाद झाले. परिणामी फलंदाजीची मदार कर्णधार धोनीवर आली होती. यावेळी धोनीनं आपले आयपीएलमधले 21वे अर्धशतक ठोकले. ब्राव्होनं यावेळी धोनीला चांगली साथ दिली. राजस्थाननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत, अंबाती रायडूला एका धावावरच बाद केले. तर, वॉटसन आणि केदार जाधवही लवकर बाद झाले. त्यानंतर धोनी आणि रैना यांनी संघाला सारवले. त्यामुळे ९ षटकांत चेन्नईला ४५ धावा करता आल्या. त्यानंतर सुरेश रैना चांगली फलंदाजी करत 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्राव्हो 27 धावा करत बाद झाला.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 09:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading