मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससाठी (CSK) वाईट बातमी आहे. टीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम (L. Sabaretnam) यांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Shreyas

चेन्नई, 25 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ससाठी (CSK) वाईट बातमी आहे. टीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम (L. Sabaretnam) यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते.

सबरेतनम इंडिया सिमेंट्सचे सल्लागार आणि कोरामंडल श्यूगर्सचे संचालक आणि सीईओ या पदावरही ते कार्यरत होते.

आयपीएलच्या या हंगामात चेन्नईची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत झालेल्या 5 मॅचपैकी 4 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्येही न पोहोचणाऱ्या चेन्नईने यंदा मात्र कामगिरीमध्ये बरीच सुधारणा केली आहे.

आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नईने बँगलोरचा (RCB) पराभव केला. 28 बॉलमध्ये 62 रनची खेळी केल्यानंतर जडेजाने बॉलिंगमध्येही कमाल केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन बँगलोरच्या 3 विकेट घेतल्या, तसंच एक ओव्हर मेडनही टाकली.

First published:

Tags: Csk, IPL 2021