• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • RCB vs CSK Live : चेन्नई समोर आरसीबीचे 157 धावांचे आव्हान; देवदत्तच्या शानदार 70 धावा

RCB vs CSK Live : चेन्नई समोर आरसीबीचे 157 धावांचे आव्हान; देवदत्तच्या शानदार 70 धावा

सलामीवीर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. चेन्नईच्या जवळपास सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत या सलामी जोडीनं चौकार-षटकारांची टोलेबाजी सुरू केली.

 • Share this:
  शारजा, 24 सप्टेंबर : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या आरसीबीच्या सलामी जोडीनं दमदार खेळी केली. मात्र, त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी फारशी चमक न दाखवल्यामुळं आरसीबीने चेन्नई समोर 157 धावांचे आव्हान ठेवलं आहे. सलामी जोडीच्या खेळीवरून आरसीबी पावणेदोनशेचा टप्पा गाठेल असे वाटत होते. पण, विराट आणि त्यानंतर पड्डीकल बाद झाल्यानंतर धावगतीला ब्रेक लागला. सलामीवीर कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. चेन्नईच्या जवळपास सर्व गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत या सलामी जोडीनं चौकार-षटकारांची टोलेबाजी सुरू केली. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनीही अर्धशतके झळकावली. अखेर 53 धावांवर विराट कोहली बाद झाला. विराटने 41 चेंडूंत 53 धावांच्या खेळीत शानदार 6 चौकार आणि 1 षटकार खेचला. डेव्हेन ब्रॅव्होच्या गोलंदाजीवर तो रवींद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. विराटनंतर पडिक्कलच्या जोडीला एबी डिव्हिलियर्स मैदानात उतरला. मात्र तो विषेश कामगिरी करू शकला नाही 12 धावांवर तो बाद झाला. देवदत्तची मात्र एका बाजूला फटकेबाजी चालूच होती, त्यानं 50 चेंडूत 70 धावांची खेळी केली, यामध्ये त्याने 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्यानंतर मधल्या फळीतील टीम डेविड, हर्षल पटेल यांनी केवळ मैदानात हजेरी लावण्याचे काम केले. हे वाचा - अखेर Team India चा पराभव! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची बाजी तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या संघातील चुरस क्रीडा प्रेमींना पाहायला मिळत आहे. सामन्यासाठी निर्धारित वेळेत होणारी नाणेफेक 10 मिनिटे पुढे ढकलण्यात आली  होती. शारजामध्ये धुळीच्या वादळामुळे नाणेफेकीला काहीसा वेळ लागला. संघ असे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, टीम डेव्हिड, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल हे वाचा - RCB vs CSK Live : टॉसच्या आधीच धुळीचं वादळ! चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा निर्णय चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेजलवुड
  Published by:News18 Desk
  First published: