मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 Live : ख्रिस मॉरीस ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला!

IPL Auction 2021 Live : ख्रिस मॉरीस ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला!

दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला आहे. मॉरीसला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 16 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. आयपीएल लिलावाच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.

पुढे वाचा ...

  चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग सिझनच्या 14 व्या इतिहासात इतिहास घडला आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू यंदा मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर होता. त्याला 2015 साली दिल्ली डेयरडेव्हिल्सनं तब्बल 16 कोटी रुपये देऊन खरेदी केलं होतं. गेल्या सहा वर्षांपासून अबाधित असलेला युवराजचा रेकॉर्ड मोडला आहे.

  दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडला आहे. मॉरीसला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 16 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. आयपीएल लिलावाच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.

  मॉरीसला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगुळरु (RCB) पंजाब किंग्स (PKBS) यांच्यात जोरदार चुरस रंगली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आपल्या जुन्या खेळाडूला खरेदी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर मुंबईला ट्रेंट बोल्टचा साथीदार म्हणून मॉरीस हवा होता. या दोन्ही टीमनं माघार घेतल्यानंतर पंजाब आणि राजस्थानमध्ये जोरदार चुरस रंगली. त्यामध्ये अखेर राजस्थान रॉयल्सनं बाजी मारली. आता मॉरीस राजस्थानच्या टीममध्ये आल्यानं जोफ्रा आर्चरचा बॉलिंगवरील ताण कमी होईल अशी आशा राजस्थानच्या फॅन्सना आहे.

  ख्रिस मॉरीस हा आयपीएलच्या लिलावात नेहमीच महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरीसला सर्वात प्रथम 2013 साली चेन्नई सुपर किंग्सनं खरेदी केलं होतं. त्यावेळी चेन्नईनं मॉरीसला त्याच्या बेस प्राईजपेक्षा 31 पट जास्त रकमेनं खरेदी केलं होतं. त्यानंतर 2016 साली त्याला राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. राजस्थानहून दिल्ली आणि बंगळुरु असा प्रवास करुन तो पुन्हा एकदा राजस्थानच्या टीममध्ये दाखल झाला आहे.

  मॉरीस हा सर्वात महागडा विदेशी खेळाडू देखील ठरला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा (Pat Cummins) रेकॉर्ड मोडला आहे. मागील वर्षी झालेल्या लिलावात कमिन्सनं बेन स्टोक्सला मागं टाकलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) कमिन्सला 15.5 कोटींना खरेदी केलं होतं. KKR नं कमिन्सला यावर्षी देखील रिटेन केले आहे.

  First published:
  top videos

   Tags: IPL 2021, Ipl 2021 auction