स्पर्धेवेळीच काढून घेतलं होतं कर्णधार पद, IPL च्या इतिहासातले 3 धक्कादायक निर्णय

स्पर्धेवेळीच काढून घेतलं होतं कर्णधार पद, IPL च्या इतिहासातले 3 धक्कादायक निर्णय

आयपीएलमध्ये आतापर्यंत एक संघ वगळता प्रत्येक संघाने 2 पेक्षा जास्त कर्णधार बदलले आहेत पण त्यातही तीन संघांनी स्पर्धा सुरु असतानाच कर्णधार बदलला आहे.

  • Share this:

आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये 73 जागा असून 332 खेळाडूंमध्ये लिलाव प्रक्रिया होणार आहे. बाकी इतर खेळाडूंची अदला बदली यापूर्वी झाली आहे. दरम्यान, आयपीएलच्या 12 व्या हंगामात अनेक फ्रँचाइजींनी त्यांचे कर्णधार बदलले. यात फक्त चेन्नई वगळता सर्व संघाचे नेतृत्व दोनपेक्षा अधिक कर्णधारांनी केलं आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबने सर्वाधिक 11 खेळाडूंनी संघाचे नेतृत्व केलं आहे. 12 व्या हंगामातही त्यांनी कर्णधार बदलला मात्र तरीही त्यांना विजेतेपद पटकावता आलं नाही. काही संघांनी तर स्पर्धा अर्धी संपल्यावर कर्णधार बदलले.

2018 मध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व अचानक अजिंक्य रहाणेच्या हाती सोपवलं होतं. स्टीव्ह स्मिथवर बंदीमुळे आयपीएलमधून बाहेर होण्याची वेळ तेव्हा आली होती. त्यावेळी रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहचला होता. मात्र, 2019 मध्ये रहाणे कर्णधार असताना आठ पैकी फक्त दोन सामने राजस्थान रॉयल्सला जिंकता आले. स्मिथ संघात परतला तेव्हा तो 10 दिवसांसाठी आहे हे माहिती असतानाही रहाणेकडून स्मिथकडे कर्णधारपद देण्यात आले. स्मिथ गेल्यानंतर पुन्हा रहाणे कर्णधार झाला.

किंग्ज इलेव्हन पंजाने डेव्हिड मिलरला 2014 च्या आयपीएलमध्ये रिटेन केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं. डेव्हिड मिलर कर्णधार असताना संघाला सुरुवातीच्या सहापैकी 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानतंर मिलरच्या जागी मुरली विजयकडे नेतृत्व देण्यात आलं. यानंतरही संघाची कामगिरी सुधारली नाही आणि पुन्हा 2017 च्या हंगामात ग्लेन मॅक्सवेलकडे नेतृत्व दिलं गेलं.

सनरायझर्स हैदराबादने 2014 मध्ये शिखर धवनला रिटेन केलं होतं. 2013 मध्ये धवननेच नेतृत्व केलं होतं. मात्र, नेतृत्वाच्या ओझ्यामुळे 10 सामन्यात एकही अर्धशतक त्याला करता आलं नव्हतं. तेव्हा डेरेन सॅमीकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्यानतंर 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद खेळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2019 09:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading