मुंबई, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन कोच्चीत सुरू झालं आहे. सर्वात पहिल्यांदा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनवर बोली लागली. त्याला गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइजवर खरेदी केलं. त्याच्यानंतर इंग्लंडचा मधल्या फळीतला फलंदाज हॅरी ब्रूकला सनरायजर्स हैदराबदने 13.25 कोटी रुपयांना खरेदी केली. या मिनी ऑक्शनमध्ये ज्या भारतीय खेळाडूवर सर्वात आधी बोली लागली तो गेल्या हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार होता. मात्र फ्रँचाइजीने त्याला रिलीज केलं होतं. यानंतर लिलावात त्याची बेस प्राइज 1 कोटी रुपये होती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मयंक अग्रवालवर सर्वात आधी बोली लावली. यानंतर पंजाब किंग्जने यात भाग घेतला. मयंक अग्रवालला खरेदी करण्यासाठी दोघांमध्ये चढाओढ सुरू झाली. चेन्नई सुपर किंग्जनेसुद्धा मयंक अग्रवालसाठी 3 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. त्यानतंर पंजाब किंग्जने 3.6 कोटी बोली लावली. 32.20 कोटी रुपये शिल्लक असतानाही पंजाब किंग्जने मयंकसाठी पुढे बोली लावली नाही. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादने बोली लावली. तेव्हा आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेर सनरायजर्स हैदराबादने 8.25 कोटी रुपयांना खरेदी केलं.
हेही वाचा : IPL Auction 2023 Live : निकोलस पूरनसाठी या संघाने मोजले 16 कोटी रुपये
पंजाब किंग्जप्रमाणे सनरायजर्स हैदराबादने कर्णधार केन विल्यम्सनला मिनी ऑक्शनआधी रिलीज केलं होतं. त्यामुळे हैदराबादला आघाडीच्या फलंदाजांमध्ये एकाची गरज होती. तसंच त्यांना नेतृत्व करण्यासाठीही एका अनुभवी क्रिकेटपटूची आवश्यकता होती. मयंक अग्रवाल या दोन्हीसाठी उपयुक्त ठरू शकतो. पंजाब किंग्जने आयपीएल 2022 मध्ये मेगा ऑक्शन आधी मयंकला 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन करत संघाचा कर्णधार केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या हंगामात पंजाब किंग्ज इलेव्हन सहाव्या स्थानी राहिले होते. आय़पीएल 2022 च्या हंगामात 13 सामन्यात एका अर्धशतकासह मयंक अग्रवालने फक्त 196 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, IPL auction