मुंबई, 23 डिसेंबर : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या हंगामात कोच्चीमध्ये मिनी लिलाव पार पडला. यात सनरायजर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली. प्रत्येक आयपीएलवेळी काव्या मारनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काव्या मारनला यावेळी मात्र सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सनरायजर्स हैदराबादने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला 1325 कोटी रुपयांना खरेदी केलं. तर मयंक अग्रवालसाठी 8.25 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांची ही खरेदी एवढ्यावरच थांबली नाही. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक हेन्री क्लासेनसाठी 5.25 कोटी रुपयांची बोली लावली. तर विवरांत शर्माला 2.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.
हेही वाचा : IPL Auction : बॅटिंगमध्ये सुपरफ्लॉप तरीही छप्पर फाड कमाई, कॅरेबियन खेळाडू काहीही न करता मालामाल!
मिनी ऑक्शनच्या सुरुवातीलाच काव्या मारन आणि तिच्या फ्रँचाइजीने इतरांना मागे टाकत मोठी बोली लावत, पाहिजे असलेले खेळाडू खरेदी केले.
#IPL2023Auction #IPLAuction #KavyaMaran Kavya maran be like: pic.twitter.com/hhPWOheyCD
— Urwashi_07 (@UGwalwanshi) December 23, 2022
हैदराबाद सनरायजर्सने दोन खेळाडूंना 22 कोटी खरेदी केले. यावरून कमेंट केल्या जात आहेत. एका युजरने मीम शेअर करताना म्हटलं की काही महाग मिळत नाहीय, तर स्वस्त असलेल्याला महाग बनवून खरेदी केलं.
हेही वाचा : IPL Auction 2023 Live : टी20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणाऱ्या जोशसाठी गुजरातने मोजले 4.40 कोटी
Kavya is shopping there..😅
— Jithin #12 (@jithin_srt) December 23, 2022
काव्या मारनने सुरुवातीलाच खेळाडूंवर लावलेल्या बोलीनंतर काव्या शॉपिंग करतेय असं काही युजरनी म्हटलं आहे. याशिवाय एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. यात हॅरी ब्रूकला खरेदी केल्यानंतर काव्याची रिअॅक्शन दिसत आहे.
Harry 'Brook'ing some #TATAIPLAuction records before making his #TATAIPL debut 😎 Watch #AuctionFreeOnJioCinema ➡ LIVE on #JioCinema 📲#IPL2023Auction #IPLAuction #TATAIPLAuctionOnJioCinema pic.twitter.com/DobVKo7RHu
— JioCinema (@JioCinema) December 23, 2022
हे असंच चालत राहिलं तर मुंबई इंडियन्सच्या वेळेपर्यंत काव्याची पर्स रिकामी होईल असं एका युजरने म्हटलं आहे.
Aisa hi chalta rha to mi k time Tak kavya ka purse Khali hoga 😂😂
— Amit Panghal (@AmitPanghal757) December 23, 2022
Kavya Maran to each player - #IPLAuction #IPLAuction2022 #HarryBrook pic.twitter.com/FWIzxNsmeY
— MemeRaoAmbedkar (@MemeraoA) December 23, 2022
काव्या मारन ही प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांची मुलगी आहे. कलानिधी हे सन ग्रुपचे संस्थापक आहेत. काव्याने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या लियोनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए पूर्ण केलं आहे. त्याआधी काव्याने चेन्नईतील स्टेला मारिस कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, IPL auction