मुंबई, 23 डिसेंबर : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनला आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात पंजाब किंग्जने विक्रमी बोली लावत संघात घेतलं. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 18.50 कोटी रुपये मोजून पंजाबने त्याला विकत घेतलं आहे. सॅम करन दुखापतीमुळे गेल्या हंगामात तो खेळू शकला नव्हता. आजच्या लिलावात सॅम करनला खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मोठी चढाओढ सुरू होती. अखेर पंजाब किंग्जने यात बाजी मारली आणि सर्वाधिक किंमत मोजून त्याला संघात घेण्यात यश मिळवलं.
सॅम करनने आय़पीएलमध्ये याआधी 32 सामने खेळले असून 23 डावात 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. यात त्याने दोन अर्धशतकेही केली आहे. तर गोलंदाजीत त्याने 31 डावात 31.09 च्या सरासरीने 32 गडी बाद केले आहेत.
Record Alert
Sam Curran ! He goes BIG - INR 18.50 Crore & will now play for Punjab Kings #TATAIPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/VlKRCcwv05 — IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
सॅम करनने त्याचं आयपीएल पदार्पण पंजाब किंग्जकडून केलं होतं. तेव्हा त्याने हॅट्ट्रिक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएलमध्ये 20 वर्षे 302 दिवस वय असताना सर्वात कमी वयात हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
हेही वाचा : IPL Auction : आयपीएलच्या लिलावात दिग्गजांची किंमत घसरली, आधीपेक्षा मिळाले कमी पैसे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, IPL auction