कोच्ची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या लिलावात अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा आली, पण वेस्ट इंडिजचा विस्फोटक खेळाडू चांगलाच लकी ठरला. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनला लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 16 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. अनेकांना निकोलस पूरनला मिळालेल्या या रकमेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण आयपीएलच्या मागच्या मोसमांमध्ये पूरनची कामगिरी निराशाजनक झाली आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचं आव्हान क्वालिफायर राऊंडलाच संपलं. पूरन वेस्ट इंडिजच्या या टीमचा कर्णधार होता.
पूरनचं आयपीएल करियर
निकोलस पूरनच्या आयपीएल करियरवर नजर टाकली तर त्याने 47 मॅच खेळल्या आहेत, यातल्या 44 इनिंगमध्ये त्याने 26.06 च्या सरासरीने फक्त 912 रन केले. 151.24 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली, यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
IPL Auction : मुंबईचा सुरूवातीलाच धमाका, ग्रीनवर ओतला पैसा, रोहित-सचिनसारखीच आहे स्टोरी
पूरनचं आंतरराष्ट्रीय करियर
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पूरनला चमक दाखवता आली नाही. वेस्ट इंडिजसाठी त्याने 72 सामन्यांच्या 64 इनिंगमध्ये 25.48 च्या सरासरीने 1427 रन केले. यात त्याला 9 अर्धशतक करण्यात यश आलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 129.02 आहे.
निकोलस पूरनने आयपीएलच्या मागचा मोसम सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. हैदराबादने पूरनला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण मागच्या मोसमातही तो सुपर फ्लॉप ठरला. त्यामुळे हैदराबादने त्याला रिलीज केलं. पूरन बॅटरसोबत विकेटकीपरही आहे.
IPL Auction 2023 Live : आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, हे प्लेयर्स झाले करोडपती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, IPL auction