मुंबई, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या हंगामासाठी लिलाव सुरू झाला आहे. यात पहिल्या टप्प्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला मोठी बोली लावत हैदराबाद सनरायजर्सने संघात घेतलं. तर काही दिग्गज खेळाडूंना बेस प्राइजवर फ्रँचाइजींनी संघात घेतलंय. काहींना आधीच्या हंगामात मिळालेल्या रकमेपेक्षा खूपच कमी किंमत यावेळी मिळाली. यात भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवालसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला गुजरात टायटन्सने त्याच्या बेस प्राइजवर खरेदी केलं आहे. विल्यम्सनची बेस प्राइज 2 कोटी रुपये होती. सनरायझर्स हैदराबादने IPL 2022 च्या मेगा लिलावात केनला तब्बल 14 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र त्याला 2022 च्या आयपीएल हंगामात फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. 2022 च्या हंगामात त्याने 93 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा केल्या होत्या.
Congratulations to @mayankcricket who will play for the @SunRisers
SRH fans - what do you guys make of this buy? 😃😃#TATAIPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/dbrbo2IbWB — IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने 50 लाख रुपयात घेतलं. त्याच्या बेस प्राइजवरच चेन्नईने विकत घेतलं. 2022 मध्ये त्याला मेगा लिलावात केकेआरने 1 कोटी रुपयात संघात घेतलं होतं.
हेही वाचा : IPL Auction : लाहोरचा कलंदर आता हैदराबादचा धुरंदर, करोडपती ब्रुक गर्लफ्रेंडसोबत जगतोय असं आयुष्य
मयंक अग्रवालला गेल्या हंगामात 14 कोटी रुपये किंमत मिळाली होती. मात्र यावेळी त्याला 8.5 कोटी रुपयात संघात घेण्यात आलं आहे. त्याला सनरायजर्स हैदराबदने 8.25 कोटी रुपयात खरेदी केलं. गेल्या हंगामात पंजाब किंग्जने त्याला रिटेन केलं होतं. मात्र पुढच्या हंगामात त्याला रिलीज केलं होतं. मिनी ऑक्शनमध्ये त्याची बेस प्राइज 1 कोटी रुपये होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2023, IPL auction, Sports