मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction : मुंबईच्या ताफ्यात तर आला पण... वॉर्नरचा ग्रीनला धोक्याचा इशारा!

IPL Auction : मुंबईच्या ताफ्यात तर आला पण... वॉर्नरचा ग्रीनला धोक्याचा इशारा!

IPL Auction आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबईने कॅमरून ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

IPL Auction आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबईने कॅमरून ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

IPL Auction आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबईने कॅमरून ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kochi [Cochin], India

कोची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबईने कॅमरून ग्रीनला 17.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे, पण ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने कॅमरून ग्रीनला धोक्याचा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम पुढचं वर्षभर क्रिकेट खेळणार आहे, त्यामुळे कॅमरून ग्रीनबाबत बोलताना वॉर्नरने थकव्याची शंका उपस्थित केली आहे.

कॅमरून ग्रीनचा अर्धा मोसम भारतात असेल, कारण आयपीएलशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात 4 टेस्ट आणि 2 वनडे खेळणार आहेत. भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियन टीम इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही जाणार आहे. कॅमरून ग्रीनने सप्टेंबर महिन्यात झालेल्या भारत दौऱ्यात टी-20 मध्ये 214.54 च्या स्ट्राईक रेटने 2 अर्धशतकं केली होती.

'माझ्या दृष्टीकोनातून ही चांगली गोष्ट आहे. त्याला 4 टेस्ट आणि त्यानंतर वनडे मॅच खेळायच्या आहेत. भारतामध्ये 19 आठवड्यांचा तुझा पहिला प्रवास आव्हानात्मक असू शकतो. मीदेखील अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला आहे. मी टेस्ट सीरिज आणि आयपीएल 2017 मध्ये सहभाग घेतला. यानंतर मी इंग्लंडमध्ये 5 टेस्ट खेळलो. यानंतर तुम्हाला दक्षिण आफ्रिकेला जायचं आहे आणि मग वर्ल्ड कप खेळण्याच्या आधी 20 दिवसांचा वेळ मिळेल,' असं वॉर्नर म्हणाला.

डेव्हिड वॉर्नरने ग्लेन मॅक्सवेलचं उदाहरण दिलं. जास्त क्रिकेट खेळल्यामुळे मॅक्सवेलने 2019 च्या शेवटी मानसिक आरोग्याचं कारण देत आराम घेतला होता. 'मॅक्सवेलने काही वर्षांपूर्वी असंच केलं होतं. तो पहिले पूर्ण वर्ष खेळला आणि मग जेव्हा मोसम आला तेव्हा त्याने ब्रेक घेतला. युवा खेळाडूच्या दृष्टीने हे पूर्णपणे आव्हानात्मक आहे,' अशी प्रतिक्रिया वॉर्नरने दिली.

IPL Auction : मुंबईचा सुरूवातीलाच धमाका, ग्रीनवर ओतला पैसा, रोहित-सचिनसारखीच आहे स्टोरी

असा असणार ग्रीनचा कार्यक्रम

आयपीएल 2023 खेळण्याआधी ग्रीन वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज खेळणार आहे. पुढच्या वर्षी 4 टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया भारतात येणार आहे. भारत दौऱ्याआधी ग्रीन बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्क्रॉचर्सकडून खेळणार आहे, यानंतर 3 वनडे मॅचही होणार आहेत.

आयपीएल झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया इंग्लंड दौऱ्यावर जाऊन 5 टेस्ट मॅचची ऍशेस सीरिज खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला पोहोचली तर या मॅचची संख्या 6 टेस्ट होईल. भारतात ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्ड कप होणार आहे, त्याआधी ऑस्ट्रेलिया ऑगस्ट महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.

वॉर्नर लागोपाठ खेळतोय आयपीएल

वॉर्नर आयपीएल 2009 पासून आयपीएलमध्ये नियमित खेळत आहे. 2018 चा मोसमात केपटाऊन बॉल टॅम्परिंग वादामुळे वॉर्नरचं निलंबन झालं होतं, त्यामुळे तो आयपीएल खेळू शकला नव्हता. वॉर्नरचं आंतरराष्ट्रीय करियर शेवटच्या टप्प्यात आहे. 2024 साली वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप खेळणं आणि भारत-इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकणं हे वॉर्नरचं मुख्य उद्दीष्ट आहे.

IPL Auction 2023 Live : आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, हे प्लेयर्स झाले करोडपती

First published:

Tags: IPL 2023, IPL auction