Home /News /sport /

IPL Auction 2022: अश्विनला राजस्थाननं खरेदी करताच जुना फोटो Viral, सेहवागनंही घेतली फिरकी

IPL Auction 2022: अश्विनला राजस्थाननं खरेदी करताच जुना फोटो Viral, सेहवागनंही घेतली फिरकी

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 15 सिझनसाठी मेगा ऑक्शनला (IPL 2022 Mega Auction) सुरूवात झाली आहे. या ऑक्शनच्या पहिल्याच टप्प्यात अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनला (R. Ashwin) राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) खरेदी केले.

    मुंबई, 12 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 15 सिझनसाठी मेगा ऑक्शनला (IPL 2022 Mega Auction) सुरूवात झाली आहे. या ऑक्शनच्या पहिल्याच टप्प्यात अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनला (R. Ashwin) राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) खरेदी केले. अश्विन हा राजस्थान टीममध्ये दाखल झालेला चौथा खेळाडू ठरला. . राजस्थानच्या टीममध्ये दाखल झालेला अश्विन हा चौथा खेळाडू आहे. राजस्थाननं यापूर्वी संजू सॅमसन, जोस बटल आणि यशस्वी जैस्वालला रिटेन केले आहे. अश्विन आणि बटलर हे दोघेही आता एकाच टीममध्ये खेळणार आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अश्विननं पंजाब किंग्जकडून खेळताना आयपीएल 2019 मध्ये जोस बटलरला मंकडिंग आऊट (Mankading out) केले होते. अश्विननं बॉल टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकरला असलेल्या बटलरनं क्रिज सोडले होते. तेव्हा अश्विननं बटलरला रन आऊट केले. अश्विननं बटलरला आऊट करताच त्याचे क्रिकेट विश्वात जोरदार पडसाद उमटले. अनेक माजी क्रिकेटपटूंनी अश्विनची ही कृती खेळभावनेला साजेशी नसल्याची टीका केली होती. त्यानंतर आता तीन वर्षांनी अश्विन आणि बटलर एकाच टीममध्ये खेळणार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्या घटनेचा फोटो व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनंही अश्विन राजस्थान रॉयल्सकडे जाताच ट्विट करत फिरकी घेतली आहे. अश्विनची ही चौथी आयपीएल टीम आहे. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings), पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या टीमकडून खेळला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022 auction, Photo viral, R ashwin

    पुढील बातम्या