मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीचा 38 वर्षांचा स्पेशल खेळाडू, ठरतोय बड्या-बड्यांवर भारी, IPL मध्येही लागणार लॉटरी!

धोनीचा 38 वर्षांचा स्पेशल खेळाडू, ठरतोय बड्या-बड्यांवर भारी, IPL मध्येही लागणार लॉटरी!

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL 2022 Mega Auction) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये आयपीएल लिलाव पार पडेल, याआधी बीसीसीआयने खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 फेब्रुवारी : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL 2022 Mega Auction) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये आयपीएल लिलाव पार पडेल, याआधी बीसीसीआयने खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एमएस धोनीचा (MS Dhoni) फेवरेट खेळाडू ड्वॅन ब्राव्होदेखील (Dwayne Bravo) आहे. ब्राव्होची बेस प्राईज 8 कोटी रुपये इतकी आहे. मागच्या काही वर्षांपासून ब्राव्हो सीएसकेच्या (CSK) टीमचा प्रमुख भाग होता, पण आयपीएल लिलावाआधी चेन्नईने त्याला रिटेन केलं नाही. तरीही 38 वर्षांचा ब्राव्हो बॉलिंगमध्ये शानदार कामगिरी करत आहे. ब्राव्हो सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. त्याची कामगिरी बघितली तर आयपीएल लिलावात कोणतीही टीम त्याला मोठी किंमत द्यायला तयार होईल.

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (Bangladesh Premier League) एक दिवस आधी खुलना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होने उत्कृष्ट बॉलिंग केली. त्याच्या या कामगिरीमुळे फॉर्च्युन बारीशलने मॅच 6 रनने जिंकली. ब्राव्होला बॅटने तर काही खास करता आलं नाही, पण बॉलिंगमध्ये त्याने 4 ओव्हर टाकून 10 च्या इकोनॉमी रेटने 40 रन देत 3 विकेट मिळवल्या. याचसह तो फॉर्च्युन बारीशलसाठी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. याशिवाय तो यंदाच्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप-5 बॉलर्समध्ये पोहोचला आहे.

ब्राव्होने आतापर्यंत 4 मॅचमध्ये 15.62 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या आहेत. 30 रन देऊन 3 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शन आधी ब्राव्होच्या या कामगिरीमुळे अनेक टीमचं त्याच्यावर लक्ष असेल. ब्राव्हो फक्त बॉलिंगच नाही तर बॅटिंग आणि फिल्डिंगही उत्कृष्ट करतो. आतापर्यंत 516 टी-20 मध्ये त्याने 6,681 रन ठोकले. या फॉरमॅटमध्ये त्याने 20 अर्धशतकं केली आहेत. तसंच त्याने टी-20 मध्ये 561 विकेटही घेतल्या आहेत.

आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स चौथ्यांदा चॅम्पियन झाली होती, त्यावेळी ब्राव्हो टीममध्ये होता. शार्दुल ठाकूरच्या 21 विकेटनंतर ब्राव्हो सीएसकेचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. त्याला 14 विकेट मिळाल्या होत्या. एवढच नाही तर त्याने मागच्या वर्षी वेस्ट इंडिजसाठीही सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. 20 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने त्याला 19 विकेट मिळाल्या होत्या.

First published:

Tags: Csk, Ipl 2022 auction, MS Dhoni