Home /News /sport /

IPL 2022 : वॉर्नरवर पडणार पैशांचा पाऊस, ही टीम सर्वाधिक बोली लावून करणार कॅप्टन!

IPL 2022 : वॉर्नरवर पडणार पैशांचा पाऊस, ही टीम सर्वाधिक बोली लावून करणार कॅप्टन!

David Warner

David Warner

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक टीमनी खेळाडू रिटेन केले आहेत, तर काही टीमना लिलावामध्ये कॅप्टनही शोधावे लागणार आहेत. यात डेव्हिड वॉर्नरचं (David Warner) नाव सगळ्यात आघाडीवर आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जानेवारी : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL Auction 2022) 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक टीमनी खेळाडू रिटेन केले आहेत, तर काही टीमना लिलावामध्ये कॅप्टनही शोधावे लागणार आहेत, यात केकेआर (KKR) आणि आरसीबीचा (RCB) समावेश आहे. कोलकात्याने त्यांचा मागच्या मोसमाचा कर्णधार इयन मॉर्गनला (Eoin Morgan) रिलीज केलं आहे, तर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सी सोडली आहे. सध्या तरी श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) हे दोन खेळाडूंमध्ये कॅप्टन होण्याच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहेत. श्रेयस अय्यरने दिल्लीचं आणि वॉर्नरने हैदराबादचं यशस्वी नेतृत्व केलं. आरसीबीची टीम लिलावामध्ये डेव्हिड वॉर्नरवर मोठी बोली लावेल असं बोललं जातंय. आरसीबी डेव्हिड वॉर्नरला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानत असल्याच्याही चर्चा आहेत. या चर्चा जोरात सुरू असल्या तरी भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते मात्र डेव्हिड वॉर्नरवर मोठी बोली लागली तरी कोणतीच टीम त्याला कर्णधार करणार नाही. यासाठी आकाश चोप्राने वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबादसोबतच्या इतिहासाचं कारण दिलं. 'आरसीबीची टीम डेव्हिड वॉर्नरला टीममध्ये घेऊ शकते, पण मला वाटतं त्याला कॅप्टन बनवण्यात येणार नाही. वॉर्नर कोणत्याही टीमचा कर्णधार होऊ शकत नाही. आयपीएल एक छोटं कुटुंब आहे. सगळ्यांना माहिती आहे, मागच्या वर्षी काय झालं होतं आणि अडचणी काय आहेत,' असं आकाश चोप्रा त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला. आरसीबीने आयपीएल लिलावाआधी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स टीमचा कर्णधार होता, पण त्याला मध्यातूनच कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. मोसमाच्या अखेरीस तर त्याला टीमबाहेरही करण्यात आलं. डेव्हिड वॉर्नर आणि हैदराबादच्या टीमसोबत वॉर्नरचा वाद झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादने 2016 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: David warner, Ipl 2022, Ipl 2022 auction, RCB

    पुढील बातम्या