Home /News /sport /

'ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना IPLमध्ये...' क्रिकेटपटूने केले गंभीर आरोप

'ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना IPLमध्ये...' क्रिकेटपटूने केले गंभीर आरोप

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये पार पडला. या लिलावात खेळाडूंवर नेहमीप्रमाणे कोट्यवधींची बोली लागली. पण न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सायमन डूल (Simon Doull) यांनी आयपीएल लिलाव प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 फेब्रुवारी : आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव (IPL Auction 2021) 18 फेब्रुवारीला चेन्नईमध्ये पार पडला. या लिलावात खेळाडूंवर नेहमीप्रमाणे कोट्यवधींची बोली लागली. पण न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सायमन डूल (Simon Doull) यांनी आयपीएल लिलाव प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. आयपीएल लिलावात न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केलं जातं, पण ऑस्ट्रेलियाच्या दुय्यम क्रिकेटपटूंना महत्त्व दिलं जात असल्याचं सायमन डूल म्हणाले. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनच्या ट्विटवर सायमन डूल यांनी प्रतिक्रिया दिली. न्यूझीलंडचा बॅट्समन डेव्हन कॉनवे (Devon Conway) ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (New Zealand vs Australia) पहिल्या टी-20 मध्ये नाबाद 99 रनची खेळी केली. यावर ट्विट करत अश्विन म्हणाला, तुला 4 दिवस उशीर झाला. आयपीएल लिलावाच्या चार दिवसानंतर कॉनवेने ही खेळी केल्यामुळे अश्विनने असं ट्विट केलं. या ट्विटवर सायमन डूल यांनी कमेंट केली. 'कॉनवेने आयपीएल लिलावाआधीही ही खेळी केली असती तरी खास फरक पडला नसता. कारण अनेक वर्ष किवी क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आयपीएलनंतर फ्रॅन्चायजी फक्त ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगवरच नजर ठेवतात, असं मला वाटतं,' असं सायमन डूल म्हणाले. डेव्हन कॉनवेला आयपीएल लिलावात कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही. पण चार दिवसानंतरच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या पहिल्याच मॅचमध्ये 59 बॉलमध्ये नाबाद 99 रन केले. कॉनवेच्या या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 10 फोरचा समावेश होता. याआधी न्यूझीलंडची स्थानिक टी-20 स्पर्धा सुपर स्मॅशच्या मागच्या 4 मॅचमध्ये वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळताना कॉनवेने 93*, 91*, 69* आणि 50 रनची खेळी केली होती. यातली नाबाद 93 रनची खेळी फायनलमध्ये कॅन्टबेरी किंग्जविरुद्ध होती. कॉनवेच्या नाबाद 99 रनच्या खेळीमुळे न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 53 रननी पराभव केला. 14.25 कोटीचा मॅक्सवेल फ्लॉप दुसरीकडे या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल पुन्हा अपयशी ठरला. मॅक्सवेलला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 14.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. या लिलावानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये मॅक्सवेलने 5 बॉलमध्ये 1 रन केली. टीम साऊदीच्या बॉलिंगवर मॅक्सवेल आऊट झाला. तसंच बॉलिंगमध्येही त्याने एक ओव्हर टाकून 9 रन दिले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या