नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : IPL 2021 च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातला लिलाव (IPL Auction live) सध्या सुरू आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकाऱ्यांंबरोबर त्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऑक्शन रूममध्ये दाखल झाला आणि त्याने अर्थातच सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या.
IPL 2021 च्या 8 फ्रँचायझींचे अधिकारी दाखल झाले. धोनी CSK च्या टीमबरोबर होता. कॅप्टन कूल धोनीने त्यांच्या टीमची पिवळ्या रंगाची जर्सी घातलेली होतीच. त्यावर त्याचा नेहमीचा लकी नंबर 7 होताच; पण त्यावरची एक ओळ अनेकांचं लक्ष वेधून घेणारी होती. डेफिनेटली नॉट - Definitely Not असं धोनी नेमकं कुणाला आणि कशाबद्दल सांगतोय याचीच चर्चा या टीशर्टमुळे सुरू झाली. निश्चितच नाही, असं धोनी कोणाला आणि कशासाठी सांगतो आहे याचं उत्तर या जुन्या VIDEO तून मिळेल.
डॅनी मॉरिसन या कॉमेंटेटरने धोनीला मागच्या IPL सीझनमध्ये विचारलं होती की, पिवळ्या टीशर्टमधला हा तुझा शेवटचा सामना असेल का? त्यावर धोनीने त्याला Definitely Not असं उत्तर दिलं होतं.
चेन्नई सुपरकिंग्जने (CSK) मागच्या आयपीएलमध्ये वाईट कामगिरी केली होती. ते गुणतक्त्यात तळाशी होते. असं असलं तरी चेन्नईच्या व्यवस्थापनाने आपण आपला कर्णधार बदलणार नाही. चेन्नईच्या टीमचं नेतृत्व धोनीच करणार असं जाहीरही केलं होतं.
Danny Morrison : Could this be your last game in yellow ? #MSDhoni : Definitely Not!#CSK have won the toss and they will bowl first against #KXIP in Match 53 of #Dream11IPL pic.twitter.com/KhaDJFcApe
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
धोनीच्या या पिवळ्या जर्सीवरच्या वाक्यामागचं रहस्य काय? तो कोणाला उद्देशून हे सांगतोय किंवा कुणासाठी आहे हे वाक्य याचा उलगडा या video मधून होईल. धोनीने पुन्हा एकदा आपल्यासाठी हे काही शेवटचं ऑक्शन नाही असं सांगण्यासाठीच टीशर्टवर ही लाइन लिहून घेतल्याची चर्चा आहे.
हे वाचा धडाकेबाज मॅक्सवेलसाठी धोनी आणि कोहलीच्या टीममध्ये चुरस, वाचा अखेर कोण जिंकलं?
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो आयपीएल तरी खेळणार का असा प्रश्न होता. पण त्याच वेळी स्वतः धोनीने आपण आयपीएल खेळत राहणार, असं स्पष्ट केलं होतं. तरीही त्याच्या फॉर्म, परफॉर्मन्स याबद्दल बोललं जात होतं.
IPL Auction 2021: CSK मॅनेजमेंटनं सांगितली मोठी बातमी, टीमच्या परंपरेला ब्रेक!
त्यातच IPL 2020 मध्ये चेन्नई संघाने वाईट कामगिरी केल्याने पुन्हा एकदा कॅप्टन कूल धोनीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. पण या टीर्शटवरून धोनीने आपले आक्रमक इरादे लिलावाच्या दिवशीच जाहीर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, IPL 2021, Ipl 2021 auction, MS Dhoni