मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 LIVE : स्टीव्ह स्मिथला मिळाली नवी टीम, ‘या’ टीमकडून खेळणार IPL

IPL Auction 2021 LIVE : स्टीव्ह स्मिथला मिळाली नवी टीम, ‘या’ टीमकडून खेळणार IPL

IPL Auction 2021 Latest Update: स्मिथसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगुळरुनं सर्वात प्रथम बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनंही त्यामध्ये उडी मारली.

IPL Auction 2021 Latest Update: स्मिथसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगुळरुनं सर्वात प्रथम बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनंही त्यामध्ये उडी मारली.

IPL Auction 2021 Latest Update: स्मिथसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगुळरुनं सर्वात प्रथम बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनंही त्यामध्ये उडी मारली.

    चेन्नई, 18 फेब्रुवारी:  इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनसाठी (IPL 2021) गुरुवारी चेन्नईमध्ये लिलावाला सुरुवात झाली आहे. आठ टीममधील 61 रिक्त जागांसाठी हा लिलाव होत आहे. या लिलावासाठी (News 18 lokmat Live IPL auction Updates) 164 भारतीय, 125 विदेशी आणि 3 असोसिएट देशांच्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

    पहिल्या टप्प्यात सलामीच्या फलंदाजांचा लिलाव सुरु झाला आहे. भारताचा ओपनर करुण नायरचं नाव सर्वात पहिल्यांदा पुकारण्यात आलं त्याला कुणीही खरेदी केलं नाही. त्यानंतर एलेक्स हेल्स आणि जेसन रॉय हे इंग्लंडचे धडाकेबाज खेळाडू देखील अनसोल्ड ठरले. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) चं नाव त्यानंतर पुकारण्यात आलं.

    IPL Auction 2021 Live UPDATE

    स्मिथसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगुळरुनं सर्वात प्रथम बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनंही त्यामध्ये उडी मारली. अखेर स्मिथला दिल्ली कॅपिटल्सनं बेस प्राईज पेक्षा फक्त 20 लाख रुपये जास्त म्हणजेच 2 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केलं. स्मिथ मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन होता. त्याला या स्पर्धेपूर्वी राजस्थाननं रिलीज केलं होतं. आता स्मिथ दिल्लीकडून पहिल्यांदाच खेळणार आहे.

    IPL Auction 2021: शाहरुखच्या मुलाकडेही आहे जबाबदारी, लिलावात पहिल्यांदा दिसला आर्यन

    भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) नं अजून या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. भारत-इंग्लंड मालिका 28 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात ही स्पर्धा सुरु होण्याची शक्यता कमी आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आयपीएल स्पर्धेपूर्वी खेळाडूंना ब्रेक देण्याची मागणी केली आहे.

    First published:
    top videos

      Tags: IPL 2021, Ipl 2021 auction