चेन्नई, 18 फेब्रुवारी : या वर्षी होणाऱ्या IPL सिझनपूर्वी (IPL 2021) किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या टीमनं आपलं नाव बदललं आहे. या सीझनपासून या टीमचं नाव पंजाब किंग्ज (Punjab Kings) असेल. पहिल्या सीझनपासून खेळत असूनही एकदाही आयपीएल न जिंकणाऱ्या तीन टीममध्ये प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) टीमचा समावेश आहे. पंजाबनं बुधवारी ट्विटरवरुन नव्या नावाची अधिकृत घोषणा केली.
पंजाबनं 13 वर्षानंतर नाव बदललण्याचा निर्णय का घेतला? याचा खुलासा टीमचा कॅप्टन के.एल. राहुल (KL Rahul) यानं केला आहे. पंजाब किंग्जनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये राहुलनं हा खुलासा केला आहे.
'किंग्ज इलेव्हन पंजाब हे माझं आवडतं नाव होतं. पण ही फक्त 11 जणांची टीम नाही. एक कुटुंब म्हणून आम्ही इथं एकत्र आहोत. टीममध्येही तसंच वातावरण आहे. त्यामुळे टीमच्या नावात बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या नव्या नावामुळे आमचं नशिब देखील बदलेल अशी आशा राहुलनं व्यक्त केली आहे.'
“I am pretty sure the new name will bring us good fortune this year!” #CaptainPunjab, we are pretty much sure, too! #SaddaPunjab #PunjabKings @klrahul11 pic.twitter.com/edIJyFNmv1
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 18, 2021
पंजाब किंग्जचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) यानंही टीमचं नाव बदलल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गेलनं देखील नव्या नावाबाबत राहुलनं व्यक्त केलेल्या भावनांवर सहमती व्यक्त केली आहे.
Here’s what the #UniverseBoss gotta say about the newly formed #PunjabKings #SaddaPunjab @henrygayle pic.twitter.com/qOrv58pjue
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) February 18, 2021
पंजाबकडं सर्वात जास्त पैसे!
आजवर फक्त एकदाच स्पर्धेची फायनल गाठलेल्या पंजाबच्या टीमकडं या आयपीएल लिलावासाठी सर्वात जास्त पैसे आहेत. चेन्नईमध्ये होणाऱ्या लिलावात पंजाबचं मॅनेजमेंट 53.20 कोटी रुपयांसह उतरेल. यानंतर रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडं (RCB) 35.90 कोटी रुपये आहेत. तर राजस्थान रॉयल्यकडं 34.85 कोटी आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबनं या आयपीएलपूर्वी ग्लेन मॅक्सवेलसह नऊ खेळाडूंना सोडले आहे. टीमचे हेड कोच आणि भारतीय टीमचे माजी कॅप्टन अनिल कुंबळे या लिलावात मजबूत टीम बनवण्यासाठी चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, IPL 2021, Ipl 2021 auction, Kl rahul, Punjab kings, Sports