चेन्नई, 18 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनसाठी होणारा लिलाव हा अनेक कारणांमुळे लक्षवेधी ठरत आहे. या लिलावात पहिल्यांदाच तीन विदेशी खेळाडूंना 14 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरीसनं (Chris Morris) तर विक्रमच केला. मॉरीसला राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 16 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला मिळालेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.
कृष्णप्पा गौतमचाही विक्रम
मॉरीसनंतर कर्नाटककडून खेळणाऱ्या कृष्णप्पा गौतमनं (Krishnappa Gowtham) देखील विक्रम केला आहे. गौतम हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला (uncapped) आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. गौतमला चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) 9 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. त्याला बेस प्राईजपेक्षा तब्बल 46 पट जास्त किंमत मिळाली आहे.
IPL Auction 2021 : मुंबई इंडियन्स झाली आणखी पॉवरफुल, आले 2 नवे खेळाडू!
कृष्णप्पा गौतम एक उपयोगी ऑफ स्पिनर आणि तळाचा उपयुक्त बॅट्समन आहे, जो जलद रन करतो. चेन्नईच्या टीममध्ये कृष्णप्पा गौतम केदार जाधवची जागा घेऊ शकतो. चेन्नईला मधल्या फळीत एका भारतीय बॅट्समनची गरज आहे, ही गरज पूर्ण करण्याची क्षमता कृष्णप्पा गौतम याच्यात आहे. चेन्नई सुपर किंग्सला या आपीएलमध्ये ऑफ स्पिनरची गरज आहे. त्यामुळे त्यांनी मोईन अली पाठोपाठ कृष्णप्पाला खरेदी केलं आहे.
प्रिती झिंटाच्या टीमकडून खेळणार शाहरुख खान, मोठ्या किंमतीमध्ये केली खरेदी
गौतमची ही चौथी आयपीएल टीम आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या तीन टीमचा सदस्य होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, Ipl 2021 auction