IPL AUCTION 2020 : मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर

IPL AUCTION 2020 : मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर

19 डिसेंबरला होणार खेळाडूंचा लिलाव. विराटसह हे पाच खेळाडू मुंबईच्या रडारवर.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : आयपीएल 2020साठी (Indian Premier League 2020) कोलकातामध्ये 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. यासाठी आठही संघ सध्या जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान यंदाच्या आयपीएल लिलावात युवा खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागण्याची शक्यता आहे.

आयपीएल ही जगातली सर्वात मोठी लीग असून यात दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल केली जाते. मात्र यंदा रेकॉर्ड ब्रेक खेळाडूंच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावासाठी 971 खेळाडूंनी निलामीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. यात चार विजेतेपद असलेल्या आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघ युवा खेळाडूंवर जास्तीत जास्त बोली लावू शकतो. मात्र लिलावासाठी मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वात कमी पैसे आहेत. मुंबई संघाकडे खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करून सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. मुंबई संघाला 7 खेळाडूंची गरज आहे, ज्यात 2 खेळाडू हे विदेशी असणे बंधनकारक आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईकडे फक्त 13.05 कोटी शिल्लक आहेत. त्यामुळं याच रकमेत मुंबईला जास्तीत जास्त खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत. त्यामुळं कमी पैसे खर्च करत या पाच युवा खेळाडूंना मुंबई संघ संधी देऊ शकतो.

वाचा-IPL लिलावात होणार टक्कर! ‘या’ खेळाडूंसाठी भिडणार मुंबई आणि बंगळुरू संघाचे मालक

यशस्वी जयस्वाल

17 वर्षीय यशस्वी जयस्वालनं यंदा विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमी कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कमी वयात द्विशतकी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. विजय हजारे स्पर्धेत त्यानं 3 शतक, एक अर्धशतक आणि द्विशतकी खेळी करण्याची कामगिरी 112.80च्या सरासरीनं केली. एवढेच नाही तर त्यांची भारताच्या अंडर-19 संघातही निवड झाली आहे. मुंबईकर यशस्वीला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ त्याच्यावर बोली लावू शकतो.

विराट सिंह

झारखंडचा फलंदाज विराट सिंह याचे नाव विराट असले तरी तो धोनीचा चाहचा आहे. विराट भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे. तर, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्यानं 3 अर्धशतकही लगावले होते.

वाचा-IPL जिंकून देण्यासाठी कर्णधाराला केले मालक! कोहलीपेक्षा जास्त आहे खेळाडूची कमाई

प्रियम गर्ग

उजव्या हाताचा फलंदाज प्रयिम गर्ग गेल्या काही दिवसात विशेष चर्चेत आले आले. कारण अंडर-19 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व प्रियमकडे देण्यात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रियमच्या नावावर द्विशतक आणि लिस्ट एमध्ये शतकी खेळीची नोंद आहे. रणजी करंडक 2018-19मध्ये गर्ग उत्तर प्रदेशकडून खेळताना सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं 67.83च्या सरासरीनं 814 धावा केल्या होत्या. त्यामुळं आयपीएलमध्ये नक्कीच त्याच्या नावाचा विचार केला जाईल.

इशान पोरेल

कोलकाताचा हा गोलंदाज 140 किलोमीट प्रतिताशी वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. 2018च्या अंडर-19 संघातील या खेळाडूनं वर्ल्ड कपमध्ये मॅच विनिंग कामगिरी केली होती. 21 वर्षीय इशान पोरेलनं देवधर ट्रॉफीच्या फायनलमध्ये 43 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. तर, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात 25.60च्या सरासरीनं 10 विकेट घेतल्या होत्या.

वाचा-पंतने कॅच सोडल्यानंतर कॅप्टन कोहलीनं प्रेक्षकांशी घेतला पंगा, VIDEO VIRAL

एम शाहरुख खान (M Shahrukh Khan):

तमिळनाडूकडून खेळणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये मॅच विनिंग कामगिरी केली. या स्पर्धेत दिनेश कार्तिकनं शाहरुखवर मोठी जबाबदारी सोपवली होती. या स्पर्धेत नाबाद अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला फायनलमध्ये पोहचवले होते. त्यामुळं शाहरुखवर आयपीएलमध्ये नक्कीच चांगली बोली लागू शकते.

Published by: Priyanka Gawde
First published: December 10, 2019, 7:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading