IPL Auction 2020 : लिलवाआधीच मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या , संघाकडे आहेत सर्वात कमी पैसे

IPL Auction 2020 : लिलवाआधीच मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या , संघाकडे आहेत सर्वात कमी पैसे

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त विजेतेपद मिळवलेल्या मुंबई संघाकडे फक्त इतकी रक्कम शिल्लक आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. यासाठी आठही संघानी काही खेळाडूंची निवड केलेली आहे. या सर्व खेळाडूंवर 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे सकाळी 10 वाजता बोली लागणार आहे. यामध्ये एकूण 73 खेळाडूंची विक्री होणार आहे. मात्र, आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे चारवेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्ससाठी मात्र चिंतेची बाब आहे.

मुंबई इंडियन्स संघाकडे आयपीएलमध्ये बोली लावण्यासाठी सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. तर, जास्त रक्कमही प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे आहे. पंजाबचा संघ आपल्याकडे 9 खेळाडूंना सामिल करू शकतात, यात 4 विदेशी खेळाडू असतील. पंजाब संघाकडे आयपीएलच्या लिलावासाठी 42.70 कोटी रुपये आहेत. या किमतीत पंजाबचा संघ आयपीएल 2020च्या लिलावात 9 खेळाडू विकत घेऊ शकतात.

वाचा-विराटशी पंगा घेण्यासाठी केजरिक विल्यम्स खेळणार IPL, ‘हा’ संघ लावणार बोली

दरम्यान, खेळाडूंला रिटेन आणि रिलीज करून सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. मुंबई संघाला 7 खेळाडूंची गरज आहे, ज्यात 2 खेळाडू हे विदेशी असणे बंधनकारक आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईकडे फक्त 13.05 कोटी शिल्लक आहेत. त्यामुळं याच रकमेत मुंबईला जास्तीत जास्त खेळाडू खरेदी करावे लागणार आहेत.

वाचा-IPL 2020 लिलावाआधीच 639 खेळाडूंचा पत्ता कट! 'हा' खेळाडू ठरणार महागडा

RCBला आहे 12 खेळाडूंची गरज

आयपीएलच्या लिलावात कोलाकात संघाकडे पंजाबनंतर सर्वात जास्त रक्कम शिल्लक आहे. ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांच्या सारख्या खेळाडूंला रिलीज केल्यानंतर केकेआरकडे 36.65 कोटी रक्कम शिल्लक आहे. यात त्यांना एकूण 11 खेळाडू खरेदी करायचे आहेत. तर, राजस्थान संघाला 4 विदेशी खेळाडूंसह 11 खेळाडूंना विकत घ्यायचे आहे. राजस्थान संघाकडे 28.90 कोटी रक्कम शिल्लक आहे. तसेच, एकही विजेतेपद न मिळालेल्या विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला 12 खेळाडू खरेदी करायचे आहेत. त्यांच्याकडे सध्या 27.90 कोटी शिल्लक आहेत. यात त्यांन 6 भारतीय तर 6 विदेशी खेळाडू खरेदी करायचे आहेत.

वाचा-IPLच्या इतिहासातले सर्वात महागडे खेळाडू, कोट्यावधींची बोली लावूनही झाले फेल!

IPL संघांकडची शिल्लक रक्कम

1. किंग्स इलेव्हन पंजाब, 42.70 कोटी

2. कोलकाता नाइटरायडर्स, 35.65 कोटी

3. राजस्थान रॉयल्स, 28.90 कोटी

4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 27.90 कोटी

5. दिल्ली कॅपिटल्स, 27.85 कोटी

6. सनराजयर्स हैदराबाद, 17.00 कोटी

7. चेन्नई सुपरकिंग्स, 14.60 कोटी

8. मुंबई इंडियन्स, 13.05 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 06:38 AM IST

ताज्या बातम्या