IPL लिलावात होणार टक्कर! ‘या’ खेळाडूंसाठी भिडणार मुंबई आणि बंगळुरू संघाचे मालक

IPL लिलावात होणार टक्कर! ‘या’ खेळाडूंसाठी भिडणार मुंबई आणि बंगळुरू संघाचे मालक

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या आठही संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या आठही संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. याआधी आठही संघांनी काही खेळाडूंना रिटेन कर काहींना रिलीज करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता लिलावाआधी संघ मालक आपल्या-आपल्या रणनीती वापरू शकतात. दरम्यान लिलावात खरी टक्कर दिसणार आहे ती, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात होणाऱ्या लिलावात मुंबई आणि बंगळुरू संघाकडून बढ्या खेळाडूंवर बोली लागू शकते. आयपीएल ही जगातली सर्वात मोठी लीग असून यात दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल केली जाते. मात्र यंदा रेकॉर्ड ब्रेक खेळाडूंच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावासाठी 971 खेळाडूंनी निलामीसाठी इच्छा व्यक्त केली आहे.

वाचा-रशियाला दणका! 2020 ऑलिम्पिक आणि 2020 फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर

दरम्यान, या लिलावातील खेळाडूंबद्दल संघातील मालकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचा संघ पाहता असे बरेच खेळाडू आहेत जे दोन्ही संघांच्या समीकरणात तंदुरुस्त आहेत. यात या तीन खेळाडूंना आपल्या संघात सामिल करून घेण्यासाठी मुंबई आणि बंगळुरू संघात टक्कर पाहायला मिळू शकते.

क्रिस लिन

यातील पहिला फलंदाज आहे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर क्रिस लिन. क्रिसला कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज करत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. क्रिस लिनसारख्या महान फलंदाजाला रिलीज केल्यानंतर सर्वांची नजर त्याच्यावर आहे. अलीकडे टी -20 लीगमध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला स्फोटक सलामीवीर हवे आहेत. दोन्ही संघांसाठी क्रिसपेक्षा चांगला दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. मुंबईने एव्हिन लुईसला रिलीज केले आहे. तर, आरसीबीनेही अनेक परदेशी खेळाडूंना संघातून बाहेर केले आहे.

वाचा-पंतने कॅच सोडल्यानंतर कॅप्टन कोहलीनं प्रेक्षकांशी घेतला पंगा, VIDEO VIRAL

रॉबिन उथप्पा

कोलकाता नाइट रायडर्सनेही रिलीज विंडोमध्ये आपला आघाडीचा फलंदाज रॉबिन उथप्पाला बाहेर केले. कोलकाताकडून उथप्पाने आयपीएलमध्ये अनेक चमकदार कामगिरी केली आहे, पण गेल्या हंगामात त्याला विशेष चांगली फलंदाजी करता आली नाही. यामुळेच केकेआरने उथप्पाला सोडण्याचा निर्णय घेतला. उथप्पा हा आयपीएलचा अनुभवी खेळाडू असून सध्या मधल्या फळीत मुंबई इंडियन्सकडे अनुभवी फलंदाज नाहीत. त्याचवेळी आरसीबीकडे विराट कोहलीशिवाय इतर कोणताही मोठा भारतीय खेळाडू नाही. त्यामुळं हे दोन्ही संघ उथप्पासाठी बोली लावू शकतात.

इयॉन मॉर्गन

इयॉन मॉर्गनचा नुकताच फॉर्म पाहता, दोन्ही फ्रेंचायझींना त्यानं आपल्या संघात सामील व्हावे, अशी इच्छा आहे. मॉर्गनने अबू धाबी टी -10 लीगमध्येही शानदार कामगिरी केली होती. आरसीबीला त्यांच्या मधल्या फळीत अनुभवी आणि आक्रमक फलंदाजाची गरज आहे, तर मधल्या फळीत मुंबईकडे कोणताही मोठा परदेशी खेळाडू नाही आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ मॉर्गनला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी बोली लावू शकतात.

वाचा-VIDEO : लाईव्ह सामन्यात खेळाडूंआधी सापाने लावली हजेरी आणि...

IPL संघांकडची शिल्लक रक्कम

1. किंग्स इलेव्हन पंजाब, 42.70 कोटी

2. कोलकाता नाइटरायडर्स, 35.65 कोटी

3. राजस्थान रॉयल्स, 28.90 कोटी

4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 27.90 कोटी

5. दिल्ली कॅपिटल्स, 27.85 कोटी

6. सनराजयर्स हैदराबाद, 17.00 कोटी

7. चेन्नई सुपरकिंग्स, 14.60 कोटी

8. मुंबई इंडियन्स, 13.05 कोटी

First published: December 9, 2019, 6:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading