IPL Auction 2020 : कार्तिकचे कर्णधारपद धोक्यात! शाहरुखच्या संघात आला वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू

IPL Auction 2020 : कार्तिकचे कर्णधारपद धोक्यात! शाहरुखच्या संघात आला वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू

इंग्लंडला 2019मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इयॉन मॉर्गनला कोलकातानं संघात घेतले आहे.

  • Share this:

कोलकाता, 19 डिसेंबर : आयपीएलच्या लिलावात सध्या परदेशी खेळाडू मालामाल होत आहेत. तेराव्या हंगामासाठी होणाऱ्या या लिलावात आतापर्यंत सर्वात जास्त ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर बोली लावली जात आहे. यात जलद गोलंदाज पॅट कमिन्सवर आतापर्यंतची विक्रमी अशी 15.50 कोटींची बोली लावण्यात आली. तर, ऑलराऊंडर खेळाडू मॅक्सवेलला 10.75 कोटींना पंजाब संघाने विकत घेतले आहे आहे. पॅट कमिन्सबरोबर कोलकाता संघानं आणखी एका स्टार खेळाडूला संघात विकत घेतले. इंग्लंडला 2019मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इयॉन मॉर्गनला कोलकातानं संघात घेतले आहे.

वाचा-कसोटीचा बादशाह IPLमध्ये मालामाल! KKRनं लावली 15.50 कोटींची विक्रमी बोली

मॉर्गन इंग्लंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटचा कर्णधार आहे. इयॉन हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळं यंदाच्या आयपीएल लिलावात मॉर्गनवर 5.25 कोटींची बोली लावण्यात आली. याआधी आयपीएल 2017मध्ये मॉर्गन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत होता. तर, 2018मध्ये त्याला कोणत्याच संघानं खरेदी केले नाही. मात्र वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या या खेळाडूला कोलकाता संघानं विकत घेतल्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. सध्या दिनेश कार्तिक कोलकाता संघाचा कर्णधार आहे. मात्र गेल्या हंगामात कोलकाता संघाला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. याआधी 2018मध्ये कार्तिकच्या नेतृत्वाखाली प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती.

वाचा-रोहित शर्माला मिळाला नवा पार्टनर! मुंबई इंडियन्सनं ‘या’ स्टार खेळाडूला घेतले संघ

वाचा-IPL 2020 Player Auction Live : KKRने एका खेळाडूसाठी मोजले 15.5 कोटी रुपये

आयपीएलच्या गेल्या हंगामात कार्तिकनं 14 सामन्यांमध्ये 253 धावा केल्या होत्या. यात 97 धावांची खेळी सर्वात जास्त ठरली. तर आयपीएलमध्ये आतापर्यंत कार्तिकनं 3 हजार 645 धावा केल्या आहेत. त्यामुळं यंदाच्या हंगामात इयॉन मॉर्गनमुळे कोलकाता संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे जाऊ शकते, यामुळं दिनेश कार्तिकचे स्थान धोक्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IPL 2020
First Published: Dec 19, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या